vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांसाठीसी.एस.सी. केंद्रातून मिळणार माफक दरात सेवा- व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांसाठीसी.एस.सी. केंद्रातून मिळणार माफक दरात सेवा- व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

 सांगली, प्रतिनिधी: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सी.एस.सी. केंद्रामधून (Common Service Centre) महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी माफक दरात सेवा मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 याबाबतचा सामजस्य करार (MOU) महामंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व सी.एस.सी. केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. या करारानुसार, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही सी.एस.सी. केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.

 सी.एस.सी. केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. महामंडळाने सी.एस.सी. केंद्रासमवेत केलेल्या करारामुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल.

 सी.एस.सी. केंद्रांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातूनच पात्रता प्रमाणपत्र (LOI) कागदपत्र, बँकेचे कर्ज मंजुरी (Bank sanction), बँकेचा हप्ता (bank statement) अपलोड करण्यासाठी प्रत्येकी रु. 70/- शुल्क आकारण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

 या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही. ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना मिळेल. या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल, असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यभरात १० हजारांहून अधिक उमेदवारांना मिळणारआज नियुक्तीपत्रे; जिल्ह्यातील २९६ जणांचा समावेश

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

बालसाहित्यिकांची कार्यशाळा व ग्रंथप्रदर्शन वाचन हे एकमेव व्यसन ज्यामुळे माणूस वाचतो- ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड

vishwatmaklokswamivarta

आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुक स्वयंसेवकांना आवाहन

सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविले