vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लेखक विरेंद्र संघवी लिखित पुस्तक How to earn more money तरुणांसह उदयोग जगतासाठी वरदायी ठरणार

लेखक विरेंद्र संघवी लिखित पुस्तक How to earn more money तरुणांसह उदयोग जगतासाठी वरदायी ठरणार

     मुंबई / प्रतिनिधी’ How to earn more money या प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक उद्योगपती विरेंद्र संघवी यांनी नवउदयोग करणाऱ्या तरुणांसाठी मैलाचा दगड ठरले आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात तरुणांनी, उद्योगपतींनी एकाच उद्योगात अडकून न पडता वेगवेगळे उदयोग केले पाहिजे. एवढेच नव्हें तर स्वतःला झोकून दिले पाहिजे. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही.

या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने अजय पोपट, महेंद्र कोठारी, नर्गीस गौर आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम मरीन लाइन्स येथील बहाई समाजाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.

 हल्दीराम,पतंजली, अमूल प्रसिद्ध अशा उत्पादनाचा दाखला देत ह्या उत्पादनाचा अधिक लाभ कसा घेता येईल याचा ही विचार होणे गरजेचे आहे.

     विरेंद्र संघवी हे गेली ४८ वर्ष आपल्या कार्याशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी केलेले कार्य सर्व तरुणांसाठी वरदान ठरले आहे. आणि आताही था पुस्तकातून तरुणांनी आकाशात उंच झेप घेण्यासाठी सरसावले पाहिजे तरच जगण्याला अर्थ प्राप्त होईल. अन्यथा हे काही जगणे आहे का? असा प्रश्न सारखा सतावित राहिल. जसे कि, जगविख्यात प्रेरणादायी लेखक स्वेट मॉडॅन यांचे pushing to the Front ह्या पुस्तकाची निर्मित्ती करून त्यावेळच्या तरुणांना आणि सध्याच्या तरुणांना प्रेरणास्थान ठरले आहे तसेच प्रेरणास्थान लेखक विरेंद्र संघवी हे देखील तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

    लेखक विरेंद्र संघवी यांनी सांगितले की, समाजसेवा, शिक्षण, गृहनिर्माण, आरोग्य या विषयावर कशाप्रकारे खर्च करता येईल याचा विचार होण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर ग्रामीण आणि शहरी भागात ही जैविक शेती, दूध उत्पादन, पेटींग, डिझाईन मार्केटिंग आदी उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

  एकंदरीत पाहता लेखक विरेंद्र संघवी यांना विविध सामाजिक, व्यावसायिक कामाच्या योगदानाबद्दल १०० हून अधिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या स्वतःच्या कंपनीत ७००० इंजिनिअर विविध विषयाच्या योजनावर कार्यरत आहेत.

    लेखक विरेंद्र संघवी यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळेपण दडलेले असते. आणि तीच त्याची ओळख असते ही ओळख ओळखल्यास प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळे करून दाखवेल एवढ मात्र निश्चित.

संबंधित पोस्ट

समर्थनम ट्रस्ट फॉर दि डिसेबल संस्थेच्यावतीने दिव्यांग आणि गरजू युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

१२ वी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळाल्यास“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले” योजनेचा “आधार”

महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाकडून उद्योजकांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन..

सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहंस्तातरण करुन घ्यावे -मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर-विभागीय आयुक्तांनी घेतला सविस्तर आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला सविस्तर आढावा-आयोगाच्या सूचनांनुसार जबाबदारीने काम करण्याचे दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

मतदान अधिकाऱ्यांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण972 मतदान केंद्रासाठी 1084 पथके

vishwatmaklokswamivarta