vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी – आमदार विलास तरे# कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देऊन जोरदार मागणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी – आमदार विलास तरे# कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देऊन जोरदार मागणी

मुंबई / पालघर. (प्रतिनिधी) – पालघर जिल्ह्यास राज्यात अवकाळी पावसामुळे भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून त्याचे पंचनामे झाले आहेत त्याअनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी अशी मागणी आमदार विलास तरे यांनी कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली

यावेळी आमदार विलास तरे म्हणाले की, पालघर जिल्हा हा प्रामुख्याने आदिवासी बहुल तसेच शेतीप्रधान जिल्हा असून बहुतेक शेतकरी वर्गाचा प्रमुख उत्पन्नाचा व उदरनिर्वाहाचा स्रोत म्हणजे भात शेती आहे. या भागातील बहुसंख्य शेतकरी केवळ पावसावर आधारित शेती करतात. मात्र, यंदा माहे ऑक्टोबर महिन्यात देखील सतत व अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून त्याचा थेट परिणाम भात शेती, नाचणी, वरई, फुल बाग, फळ बाग तसेच, वीट उत्पादक व्यावसायिकांवर झाला आहे. भाताच्या पिकाची कापणी सुरू असतानाच झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातील पिके आडवी झाली, पाण्याखाली गेली तसेच काही ठिकाणी पिकांचे रोपण सडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खत व मजुरीसाठी कर्ज घेतलेले असून, पिकाचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा स्थितीत शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने आपण संबंधित महसूल अधिकारी, कृषि अधिकारी व तहसिल प्रशासन यांना तातडीने सूचना देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करून योग्य ती हानीचे मूल्यमापन करून शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी अशी मागणी आमदार विलास तरे यांनी केली आहे.

यावर कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले की, आम्ही खाली सूचना दिल्या असून लवकरच शेतकऱ्यांना मदत केली जाईल. उक्त मंत्री महोदयांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित पोस्ट

पुढील ३ तासात लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची; तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.

vishwatmaklokswamivarta

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम-एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल नवीन 150 सीएनजी बसेसचे लोकार्पण…

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असणार ..!

vishwatmaklokswamivarta

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शताब्दी वर्षात समतामूलक भारताचा