vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

जालना जिल्ह्यातील संत निरंकारी भाविक सत्संगाकरिता दिल्लीस रवाना

जालना जिल्ह्यातील संत निरंकारी भाविक सत्संगाकरिता दिल्लीस रवाना

जालना (प्रतिनिधी) : दिल्ली येथे होणाऱ्या समागम सत्संग – २०२५ या भव्य आध्यात्मिक सोहळ्यासाठी जालना जिल्ह्यासह नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक संत निरंकारी भाविक आज दि.२९ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या सत्संगाकरिता माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून मागील तीन वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या नांदेड ते पानिपत या विशेष रेल्वे गाडीने आज रवाना झाले

जालना जिल्ह्यातील संत निरंकारी भाविक जालना रेल्वे स्थानकावरून या विशेष रेल्वेने सर्व जन रवाना होत असताना भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, जालना जि.प. सदस्या सौ. आशाताई पांडे, नगरसेविका सौ. संध्याताई देठे, कपिल दहेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला व सकाळी ११.३० वा हि रेल्वे गाडी जालना रेल्वे स्थानकावरून पुढील प्रवासाकरिता रवाना झाली

यावेळी बोलताना शुभेच्छा पर बोलताना भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, या जिल्ह्याचे लोकनेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे रेल्वे राज्यमंत्री असताना जालना जिल्ह्याला अनेक नवीन रेल्वे गाड्या सुरु करून दिल्या ज्यामध्ये जनशताब्दी एक्स्प्रेस, वंदेभारत एक्स्प्रेस, ओखा एक्स्प्रेस, छपरा एक्स्प्रेस इत्यादी गाड्यासह अनेक नवीन रेल्वे गाड्या सुरु करून जालना जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, तीर्थयात्री इत्यादीसह जनतेची होणारी प्रवासाची गैरसोय दूर केली. ते बघून मागील तीन वर्षापासून जालना जिल्ह्यातील संत निरंकारी भाविक उत्तर भारतात होणाऱ्या अध्यात्मिक सोहळ्यासाठी जातात त्यासाठी त्यांनी दानवे साहेबाना विनंती करून विशेष रेल्वे गाडीची मागणी केली होती दानवे साहेबांनी स्वत: प्रयत्न करून या भाविकांची अडचण दूर करण्यासाठी अध्यात्मिक सोहळ्यासाठी नांदेड ते पानिपत हि विशेष गाडी सुरु करून भाविकांची अडचण सोडवली.

यावेळी मान्यवरांनी रेल्वे चालक तसेच जाणाऱ्या सर्व भाविकांचे पुष्पहार घालून स्वागत केले व त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख, गोवर्धन कोल्हे, विष्णू डोंगरे, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, इत्यादीसह शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कोयनानगर एमटीडीसी रिसॉर्टचा होणार कायापालटकोयना परिसर पर्यटनाचे हब होणार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई..

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या 10 वर्ष पुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

vishwatmaklokswamivarta

गॅस गळती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे ‘मॉकड्रिल’; रंगीत तालीम संपन्न

vishwatmaklokswamivarta

मारवाडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शितला माता मंदिर परिसर स्वच्छता करा-विकासकुमार बागडी..

बीजोत्पादनातून महिला सक्षमीकरणाचा ‘जालना पॅटर्न’

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न