vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

 बुलढाणा, प्रतिनिधी): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजागार युवक व युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय, म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. 10 ते 14 नोव्हेंबर 2025 या पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहे.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा सुशिक्षित बेरोजगार यांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा हा आहे. या प्रशिक्षणात शेळीपालन, कुक्कुट आणि गाय म्हैस पालनाचे तंत्र व प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन, रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार व उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे. त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, शासकीय योजनाची माहितीचे मार्गदर्शन या प्रशिक्षणात तज्ञ व्यक्ती करणार आहे.
      प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान 5 वी पास, वय 18 ते 60 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाईल. प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी दि. 14 नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालय जवळ, चिखली रोड, बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय त्यांना 8275093201/9011578854 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांनी केले आ

संबंधित पोस्ट

राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद केंद्रीय परिवहन व महामार्ग रस्ते विकास विभाग राज्यमंत्री अजय टम्टा यांच्याशी चर्चा…

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदेपुढील तीन महिन्यात भरणार- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जाफ्राबाद येथे मोफत गारमेंट मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश…     

सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती