vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जप्त व बेवारस वाहनांचा १२ एप्रिल रोजी लिलाव

जप्त व बेवारस वाहनांचा १२ एप्रिल रोजी लिलाव

राज्य प्रतिनिधी गडचिरोली – देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तसेच अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्यात बेवारस अवस्थेत उभी असलेल्या वाहनांचा १२ एप्रिल २०२५ रोजी देसाईगंज येथे कायदेशीर लिलाव करण्यात येणार आहे.

देसाईगंज पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली २९ दुचाकी, ८ चारचाकी वाहने, तसेच बेवारस स्थितीत आढळून आलेली ७७ दुचाकी आणि १५ चारचाकी वाहने अशी एकूण १२९ वाहने उभी आहेत. या सर्व वाहनांचा मूळ मालक शोधूनही न सापडल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून कायदेशीर लिलावाची मागणी करण्यात आली होती

या लिलावामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात अथवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन देसाइगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणिमार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार

ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत- प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन

गडचिरोलीच्या कायापालटासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार : आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची ग्वाही

संभाव्य विस्थापित जनावरांना चारा, पाणी, पशुखाद्य देण्यासाठी 29 मे पर्यंत दरपत्रक मागणी

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta