vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन

सातारा प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा तसेच सर्व तालुका न्यायालयात शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हयातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तडजोड होवू शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे असे संबंधित अधिक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, शुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरुपी वादात होणार नाही. हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपील होत नाही, वेळ व पैशाची बचत होते.

लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस वाघमारे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या; महिला व बालविकास विभागाचे आवाहन

औषधी व सुगंधी वनस्पतीच्या लागवड अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते;मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शासन निर्णयाची प्रशासकीय अधिकार्‍यांकडून पायमल्ली- अ‍ॅड. मगरेप्रशासनाने दलीत आदिवासी गायरान कास्तपट्टे सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाने हिसकावून घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआंदोलन -अ‍ॅड.भास्कर मगरे यांचा प्रशासनाला इशारा

पावसाळी पूर व्यवस्थापनासाठी आंतरराज्यीय समन्वय बैठक संपन्न, संभाव्य पूर नियंत्रणासाठी समन्वय आणि प्रभावी नियोजनाचा निर्णय..