vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

 सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अपर जिल्हाधिकारी, सांगली यांच्याकडे दाखल असलेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, वाळवा, शिराळा व जत तालुक्यातील अर्धन्यायिक प्रकरणांच्या अनुषंगाने संबंधित तालुक्यांच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे दिनांक 25 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, मिरज येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वाळवा व शिराळा तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, वाळवा येथे, खानापूर व आटपाडी तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, विटा येथे, कडेगाव व पलूस तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, कडेगाव येथे तर जत तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, जत येथे लोकअदालत घेण्यात येणार आहे.

 लोकअदालतीत सहभागी होणाऱ्या पक्षकार व विधिज्ञ यांनी नियोजनानुसार लोकअदालतीमध्ये सहभागासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून दिनांक 19 जून 2026 अखेर संबंधित तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अपील शाखेत सादर करणे आवश्यक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गोदा ते नर्मदा यात्रा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धनाचा संकल्प – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील धुळेकरांनी केले गोदा ते नर्मदा जलयात्रेचे जल्लोषात स्वागत

एच आय व्ही संसर्गित रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे,जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीत निर्देश

अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीने भरा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

वैज्ञानिक बलून उड्डाण; नागरिकांना सापडल्यास स्थानिक तहसिल, पोलीस स्टेशनला कळवावे – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य वाटप 

vishwatmaklokswamivarta

अकोल्यात हिंदुत्वाचा महाहुंकार: ‘भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित करा’– आमदार टी. राजा सिंह यांचे प्रतिपादन१६ हजारांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत अकोल्याचे ‘एकवीरा मैदान’ चैतन्यमय;संतांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडली भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा..

vishwatmaklokswamivarta