vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी दि.८ एप्रिल ते दि.१४ एप्रिल २०२६ या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि.९ एप्रिल २०२६ रोजी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे सकाळी ११ वाजता प्रमुख कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर तसेच चवदार तळे सत्याग्रहावर श्री. सुधीर जानराव यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच संत गाडगे महाराज व स्वच्छता अभियान या विषयावर श्री. गणेश खातू मार्गदर्शन करणार आहेत. जावळी (ता. माणगाव) येथील शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांकडून संत गाडगेबाबांवरील भारुड व चवदार तळे सत्याग्रहावर लघुनाट्य सादर केले जाणार असून, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे प्रतीकात्मक वाटप होणार आहे.

शुक्रवार, दि.१० एप्रिल २०२६ रोजी गोविंद बंदर, अलिबाग येथे सकाळी १० वाजता दलित वस्तीत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच आय.टी.आय. कॉलेज, अलिबाग येथे मार्जिन मनी योजना कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंती द्विशताब्दी वर्षानिमित्त सार्वजनिक विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज, पेण येथे सकाळी १० वाजता त्यांच्या समाजकार्यावर श्री. प्रकाश सोरटे यांचे व्याख्यान होणार आहे.

रविवार १२ एप्रिल २०२६ रोजी पनवेल येथे जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दि. १३ एप्रिल २०२६ रोजी कष्टकरीनगर, खालापूर येथे रक्तदान शिबीर (सकाळी १० वाजता) तसेच सेक्टर १०, कामोठे, पनवेल येथे महिला मेळावा (दुपारी २ वाजता) आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवार, दि.१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी ९ वाजता अलिबाग येथे पदयात्रा काढण्यात येणार असून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय ते डॉ. आंबेडकर पुतळा असा मार्ग असणार आहे. यावेळी संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले जाईल. दुपारी २ वाजता मागस्वर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग येथे डॉ.आंबेडकर यांच्या विचारांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालखी महामार्गाची पाहणी

सीआयडी चा अहवाल -वांद्रे येथील निवासस्थानातून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळले नाही, बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण..

vishwatmaklokswamivarta

शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख होण्यासह बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु 

शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर.

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत उपराष्ट्रिय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम…

vishwatmaklokswamivarta