vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (दि.२१)बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामुहिक योगासने

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (दि.२१)बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामुहिक योगासने

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योग दिन रविवार दि.२१ रोजी आहे. यानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत सामुहिक योगासने करण्यात येणार आहेत. बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान करण्यात आले आहे. याशिवाय विविध संस्थांनीही कार्यक्रमाचे आयोजन करावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी.एम., निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधीक्षक डॉ. शिल्पा जमगाडे, जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवाल तसेच विविध योग संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते.

 बैठकीत माहिती देण्यात आली की, ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’, ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना आहे. रविवार दि.२१ रोजी सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात योगा प्रात्यक्षिके केली जातील. बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूल या दोन ठिकाणी या मुख्य कार्यक्रम होईल. त्यात किमान एक हजार व्यक्ति सहभागी होतील,असे नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय विविध संस्थांनीही आपल्या स्तरावर योग प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम आयोजित करावा,असे आवाहन करण्यात आले. बिबी का मकबरा येथे भारतीय योग संस्थान व जिल्हा योगासन स्पोर्ट्स असो. या संस्था सहभागी होतील. तर विभागीय क्रीडा संकूल येथे द आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग संस्था या संस्था सहभागी होतील. या शिवाय सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होतील.

०००००

संबंधित पोस्ट

प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्प व प्रेशरमिडच्या वापरास प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस चे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर त्यांच्या राहत्या घरी निधन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव• मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन…

.सात-बारा उताऱ्यावरील नाव नोंदणी, फेरफार प्रक्रिया झाली गतिमान- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्त्‌वाखाली महसूल विभागाची विशेष मोहीम- अधिकार अभिलेखात नावनोंदणी होणार जलद- शेतकरी, सामान्य नागरिकांच्या पैसे व वेळेत बचत

vishwatmaklokswamivarta

स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणार जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

नौदल प्रमुखपदी कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन