vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव; अमोल वानखडे यांना ‘हिंदुरत्न’, तर प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना ‘नवदुर्गा सन्मान’*

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव; अमोल वानखडे यांना ‘हिंदुरत्न’, तर प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना ‘नवदुर्गा सन्मान’*

 

राज्य प्रतिनिधी  *पुणे/सातारा* : राष्ट्र उभारणी, धर्मप्रसार आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हिंदु जनजागृती समितीच्या दोन कार्यकर्त्यांना नुकतेच प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथे श्री. अमोल वानखडे यांना महाराष्ट्र राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. रवींद्र साठे यांच्या हस्ते ‘हिंदुरत्न पुरस्कार २०२६’, तर सातारा येथे प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या सापटणेकर यांच्या हस्ते ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.

 राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून पुण्यातील ‘संकल्प बँक्वेट हॉल’ येथे ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष श्री. रवींद्र साठे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील ६७ मान्यवरांना या वेळी गौरवण्यात आले. पद्मश्री डॉ. मणिभाई मानवसेवा ट्रस्टचे संस्थापक डॉ. रवींद्र भोळे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात श्री. वानखडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आपण समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी समर्पित करत असल्याचे श्री. वानखडे यांनी म्हटले आहे.

 दुसरीकडे सातारा येथील ‘श्री पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने २५ ऑक्टोबरला आयोजित सोहळ्यात प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना ‘नवदुर्गा सन्मान’ देऊन गौरवण्यात आले. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या सापटणेकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील अन्य आठ कर्तृत्ववान महिलांसह त्यांचा सन्मान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात बोलताना श्री. रवींद्र साठे म्हणाले की, नागरिकांनी मातृभूमीवर प्रेम करत स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर दिल्यास देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनेल. हिंदु एकात्मतेचे तसेच राष्ट्रभक्तीचे कार्य निःस्वार्थ भावाने करणाऱ्या पुरस्कारार्थींचे त्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमात ‘मोमेंटो’ या परकीय शब्दाऐवजी ‘स्मृतीचिन्ह’ या शब्दाचा वापर आणि मेणबत्तीऐवजी पारंपरिक दिव्याने दीपप्रज्वलन करण्याचा आग्रह धरून श्री. साठे यांनी भारतीय संस्कृतीचा आदर्श उपस्थितांसमोर ठेवला.

 सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे आज संपूर्ण भारत अखंड आहे. त्यांनी ५६० हून अधिक संस्थाने विलीन करून घेतली. त्यांच्याच कार्याचे स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम प्रतिवर्षी घेतला जातो. हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्यांना पुढील कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा हा पुरस्कार देण्यामागील उद्देश आहे, असे मत पद्मश्री डॉ. मणिभाई मानवसेवा ट्रस्टचे संस्थापक डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले.*श्री. सुनील घनवट,*राज्य संघटक, महाराष्ट्र व छ‌त्तीसगड,(हिंदु जनजागृती समिती, संपर्क : ७०२०३८३२६४)

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना निर्बंधअत्यावश्यक सेवांना व रस्ते कामांच्या वाहनांना सूट

vishwatmaklokswamivarta

कुणबी जात प्रमाणपत्रा साठी उद्या शिरडशहापूर, आ. बाळापूर, साळवा, टेभूर्णी, गिरगाव, हत्ता, साखरा, बाभूळगाव, हिंगोली शहर व ग्रामीण मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण

राज्यात गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला वेग लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्याचे आवाहन

काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश**”रोबोटिक बोयो” ची उपयुक्तता पुन्हा झाली अधोरेखित*

श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा पुरातत्व विभागाच्या सूचनांनुसार विकास कामे करा-बी. वेणूगोपाल रेड्डी