कुणबी जात प्रमाणपत्रा साठी उद्या शिरडशहापूर, आ. बाळापूर, साळवा, टेभूर्णी, गिरगाव, हत्ता, साखरा, बाभूळगाव, हिंगोली शहर व ग्रामीण मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन
कुणबी जात प्रमाणपत्रा साठी उद्या शिरडशहापूर, आ. बाळापूर, साळवा, टेभूर्णी, गिरगाव, हत्ता, साखरा, बाभूळगाव, हिंगोली शहर व ग्रामीण मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन
राज्य प्रतिनिधी-
कुणबी जात प्रमाणपत्रासाठी उद्या शिरडशहापूर, आ. बाळापूर, साळवा, टेभूर्णी, गिरगाव, हत्ता, साखरा, बाभूळगाव, हिंगोली शहर व ग्रामीण मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन कागदपत्रे, वंशावळ व अर्ज प्रक्रियेबाबत नागरिकांना मार्गदर्शन14 सप्टेंबर रोजी वारंगा फाटा व पुसेगाव, खानापूर येथे शिबिर संपन्न
हिंगोली दि. 15 सप्टेंबर:- हिंगोली जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 14 सप्टेंबर रोजी कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, सेनगाव तालुक्यातील पुसेगाव, हिंगोली तालुक्यातील खानापूर ची. येथे शिबिर आयोजित केले होते. आयोजित केलेल्या शिबिरामध्ये 6 अर्ज प्राप्त झाले असून 04 अर्ज मान्य केले आहेत.
उद्या 16 सप्टेंबर 2026 रोजी शिरडशहापूर, आ. बाळापूर, साळवा, टेभूर्णी, गिरगाव, हत्ता, साखरा, बाभूळगाव, हिंगोली शहर व ग्रामीण येथे आयोजित केले आहेत. तरी कुणबी जात प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी या विशेष शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या शिबिरांमध्ये कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, जुन्या महसुली अभिलेखांमधील नोंदी, वंशावळ तयार करण्याची पद्धत, उपलब्ध पुराव्यांचे महत्त्व तसेच जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची कार्यपद्धती याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले
तसेच नागरिकांना त्यांच्या उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करून घेण्यासाठी व कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले जुने महसुली अभिलेख, शैक्षणिक अभिलेख, जन्म-मृत्यू नोंदी, कुटुंबातील पूर्वजांच्या जात नोंदी, वंशावळीसंबंधी कागदपत्रे व इतर उपलब्ध पुरावे घेऊन संबंधित मंडळ स्तरावरील शिबिरास उपस्थित राहावे.
हिंगोली जिल्ह्यातील महसूल मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून संबंधित मंडळातील नागरिकांनी आपल्या मंडळासाठी निश्चित केलेल्या दिनांक व वेळेनुसार शिबिराचा लाभ घ्यावा.