vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आधुनिक तंत्रज्ञानामुळे भात शेती अधिक किफायतशीर व उत्पादनक्षम होणारतुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

आधुनिक तंत्रज्ञानामुळे भात शेती अधिक किफायतशीर व उत्पादनक्षम होणारतुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

 

गडचिरोली, प्रतिनिधी : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वडसा तालुक्यातील मौजा तुळशी येथे खरीप हंगामपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सगुणा भात लागवड तंत्रज्ञान (SRT), पेरणी यंत्राद्वारे भात लागवड (DSR), माती परीक्षण व बीज प्रक्रिया याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती प्रीती हिरळकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर टाळून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन केले. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, हिरवळीची व कंपोस्ट खते तसेच पीक फेरपालट यांचा अवलंब करण्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी पी. डी. खंडाळे यांनी सगुणा भात लागवड तंत्रज्ञानाची माहिती देत शून्य मशागत पद्धतीचे फायदे स्पष्ट केले. आत्माचे बीटीएम व्ही. डी. रहांगडाले यांनी SRT पद्धतीमुळे नांगरणी, चिखलणी, रोवणी व इंधन खर्चात बचत होऊन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते, असे सांगितले. सहायक कृषी अधिकारी अतुल देशमुख यांनी DSR पद्धतीची माहिती देत या तंत्रज्ञानामुळे चिखलणी व रोवणीचा खर्च कमी होतो, असे स्पष्ट केले. कु. कल्पना ठाकरे यांनी माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून उपस्थित शेतकऱ्यांनी SRT व DSR पद्धतीबाबत उत्सुकता व्यक्त केली तसेच लागवडीसाठी यंत्रांची मागणीही केली.

कार्यक्रमाला देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी, संचालक मेघनाथ दुनेदार, तुळशीचे सरपंच नाकाडे, उपसरपंच सुरेश तोंडफोडे, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व्ही. डी. रहांगडाले यांनी केले, तर नितीन मुदामवार, अतुल देशमुख व सुरेश तोंडफोडे यांनी परिश्रम घेतले.#गडचिरोली #Gadchiroli #maharashtra @mahadgipr

संबंधित पोस्ट

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta

लातूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत शौर्य दिन उत्साहात साजरा

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण घरकुल कामांचा पहाणी दौरा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश जारी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात पाणी उपसा करण्यास बंदी..

विधानसभा प्रश्नोत्तरे- नो युवर डॉक्टर’ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta