vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

नवीन रास्त भाव दुकानांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी पुरवठा विभागाचे आवाहन*

नवीन रास्त भाव दुकानांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी पुरवठा विभागाचे आवाहन*

 

 

सातारा प्रतिनिधी: सातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता 122 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजुर करण्याच्या दुष्टीने जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. नवीन रास्त भाव दुकानाच्या मंजूरीकरीता संबंधित ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यापैकी ज्यांना अर्ज करावयाचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधून 1 जानेवारीपासून 31 जानेवारी 2025 अखेर आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदारांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

नवीन रास्तभाव दुकान प्राधान्यकमानुसार मंजूरी करीता सातारा तालुक्यातील 10 गावे, वाई तालुक्यातील 17 गावे, कराड तालुक्यातील 7 गावे, महाबळेश्वर तालुक्यातील 44 गावे, कोरेगाव तालुक्यातील 10 गावे, खटाव तालुक्यातील 9 गावे, फलटण तालुक्यातील 4 गावे, पाटण तालुक्यातील 7 गावे, माण तालुक्यातील 5 गावे, खंडाळा तालुक्यातील 9 गावे, अशा एकूण 122 गावांचा समावेश आहे. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.000

संबंधित पोस्ट

राज्यातील सर्व शाळा मॉडेल स्कूल करण्याचा प्रयत्न– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ‘चला शाळेत जाऊया’ उपक्रमांतर्गत शाळांना भेटी; विद्यार्थ्यांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

राज्यात गुन्हेगारीत घट; न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी होणार

महाराष्ट्राची लोकमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड· जिल्हा परिषद ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वॉकेथॉन

कर्णपुरा यात्रोत्सव पूर्वतयारी आढावाशासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना…