vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणांना गती देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या सूचना  जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणांना गती देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या सूचना  जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

 

सांगली, प्रतिनिधी.) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे, डॉ. निलिमा सरप (लखाडे) आणि डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विषयांचा सविस्तर आढावा घेताना या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष स्नेहल भोसले, उपायुक्त नागनाथ चौगुले, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे, सदस्य सचिव मेघराज भाते, तसेच मिरज, जत, पलूस-कडेगाव, वाळवा-इस्लामपूर आणि खानापूर-विटा येथील प्रांताधिकारी उपस्थित होते.बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, तसेच आवश्यक त्या ठिकाणी समन्वय साधून कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना आयोगाच्या सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सांगली जिल्ह्यात कार्यरत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण तसेच आश्रमशाळा व वसतिगृह अधीक्षक पदांच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आश्रमशाळांना नियमित भेटी देऊन आवश्यक सूचना द्याव्यात आणि कार्यप्रणाली अधिक परिणामकारक करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा, असे निर्देशही आयोगाच्या सदस्यांनी यावेळी दिले.

00000

संबंधित पोस्ट

पैठण येथे पर्यटन स्थळांना सुविधा तयार कराव्यात : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह #पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता

विधानसभा लक्षवेधी सूचना :भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या विकासकांवरीलकारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

शिक्षक पात्रता परीक्षा वेळापत्रक जाहीरपनवेल शहरातील एकूण 6 केंद्रांवर घेण्यात येणार परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार