
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान; धोतर्डी येथे समाधान शिबिराला मान्यवरांची उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते विविध दाखले व लाभ वितरण
अकोला, प्रतिनिधी : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महसूल विभागातर्फे अकोला तालुक्यातील धोतर्डी येथे सांगरूळ महसूल मंडळातील सर्व गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मुख्य प्रतोद- भाजपा विधिमंडळ (मंत्री दर्जा) रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना, अपर आयुक्त सूरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी अकोला शरद जावळे , तहसीलदार अकोला कुणाल झाल्टे , अकोला महानगरपालिका नगरसेवक जयंत म्हैसने , सर्व नायब तहसीलदार , मंडळातील ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिबिराचे ठिकाणी सर्व तालुका विभागप्रमुख व त्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरामध्ये माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात महसूल विभागाने नागरिकांसाठी घेतलेले निर्णय व योजनांबाबत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी उपस्थित नागरिकांना माहिती दिली. त्याचप्रमाणे, इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा त्यांच्या विभागामार्फत नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सेवा व योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली.
समाधान शिबिराचे ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना विविध दाखले, सातबारा , प्रमाणपत्र, रेशन कार्ड, फेरफार, यांचे वाटप करण्यात आले. कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॉलीचे वितरण करण्यात आले.
*संगायो विभाग तहसील कार्यालय अकोला* मार्फत शिबिराचे ठिकाणी उपस्थित दिव्यांग लाभार्थी व इतर लाभार्थी यांची अपडेशन , ई केवायसी करण्यात आली तसेच हयातीचे प्रमाणपत्र जमा करून घेण्यात आले. भविष्यात असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचून शासकीय योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण असल्याचा मानस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला. उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
०००



