vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी,माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश …

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी,माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश …

जालना,  (प्रतिनिधी) – जालना शहरातील उद्योग नगरी परिसरातील श्री सत्यजित राय, उत्तर भारतीय संघाचे शितला प्रसाद पांडे व उत्तर भारतीय नागरिकांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेऊन जालना ते पटना रेल्वे मार्गाची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जालना व परिसरातील सुमारे पंचवीस हजार उत्तर भारतीय नागरिकांच्या सोयीसाठी या गाडीची मागणी केली.

या प्रयत्नाला यश आले असून रेल्वे प्रशासनाने नांदेड-रायचूर व पूर्णा- पटना या दोन्ही गाड्यांचा विस्तार आता जालना पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड-रायचूर ही गाडी तात्पुरत्या स्वरूपात जालना वरून सुरू होणार असून प्रथमतः नांदेडला जाईल आणि त्यानंतर रायचूरपर्यंत धावेल.

तसेच पूर्णा-पटना ही गाडी देखील जालना पासूनच उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे जालना, परभणी, पूर्णा व नांदेड या भागातील प्रवाशांना रायचूर व पटना भागात जाण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ व खर्च वाचणार आहे. या निर्णयाचे स्वागत नागरिकांकडून होत असून माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई महापलिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या चार ही पक्षांनी एकत्र लढाव्यात- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्षाला जागा सोडाव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

राहुरी पोटनिवडणुकीत प्रचारानंतर बाहेरील कार्यकर्त्यांवर निर्बंध

गिरगाव चौपाटी गेट वे ऑफ इंडिया, आणि नरिमन पाँईट येथे ‘पर्यटन सुरक्षा दल’ नेमणार-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक आरोग्य सेवेला बळ; शस्त्रक्रियांची अचूकता आणि सुरक्षितता वाढणार

शेतीच्या व्यवहरातुन फसवणूक केल्या प्रकरणाी तालुका पोलीस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर विकास कामांच्या गुणवत्तेवर भर द्या तसेच iPAS प्रणालीचा 100 टक्के वापर करावा – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील,जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध योजनांचा आढावा..