vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची स्वामी नारायण मंदिर येथे भेट* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत स्वामीनारायणाचे घेतले दर्शन

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची स्वामी नारायण मंदिर येथे भेट*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत स्वामीनारायणाचे घेतले दर्शन

मुंबई, प्रतिनिधी:- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी दादर येथील बीएपीएस स्वामी नारायण मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा होते.

मंत्री श्री.नड्डा व मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी मंदिर , योगी सभागृह या मंदिर परिसरातील स्थळांची पाहणी केली. प्रभू पूज्य प्रमुख स्वामी महाराज यांनी त्यांना यावेळी मंदिराच्या कार्याची, ब्रम्हानंद शिबिर हिंदोला उत्सव व वर्षभर होणाऱ्या उपक्रम यांची माहिती दिली. यावेळी वैदिक विद्यार्जन करणाऱ्या अनुयायांनी मंत्रोच्चाराच्या घोषात स्वागत केले.बांद्रा पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट

सध्या होत असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्य महोत्सव 2025म्हणून साजरा होत आहे. मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी या निमित्ताने बांद्रा पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट दिली. यावेळी विविध गणेशभक्तांशी संवाद साधला. गणेश उत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने प्रेरणादायी देखाव्यांचे प्रदर्शन केले आहे. यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण..

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण रस्त्यांची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे जामखेड तालुक्यातील दौंडाचीवाडी-तरडवाडी व वंजारवाडी-तित्रंज रस्त्यांचे भूमिपूजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन वाशी चौकातील अश्वारूढ शिवपुतळ्यास वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रेत नागरिकांसह मोठ्या संख्येने युवकांचा उत्साही सहभाग..

vishwatmaklokswamivarta

पर्यटन वृद्धीसाठी महिला केंद्रीत ‘आई’ धोरण

vishwatmaklokswamivarta

कृष‍ि विभागाची धडक कारवाई व‍िनापरवाना बीटी कापुस ब‍ियाणे व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल 

vishwatmaklokswamivarta