vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण २०२५ : ग्रामपंचायतींनी सर्वेक्षणासाठी सज्ज व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले 

ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण २०२५ : ग्रामपंचायतींनी सर्वेक्षणासाठी सज्ज व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले

 

 रायगड ( प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींच्या १८३० गावांमध्ये लवकरच केंद्रस्तरीय समितीमार्फत स्वच्छतेची तपासणी करण्यात येणार आहे.या सर्वेक्षणामध्ये गाव पातळीवरील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृश्यमान स्वच्छता, ओला व सुका कचरा वेगळीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, खत खड्डे, प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.

तपासणीदरम्यान समितीकडून घरोघरी भेटी दिल्या जातील आणि नागरिकांच्या हात धुणे, शौचालयाचा नियमित वापर, कचरा व्यवस्थापनाच्या सवयींचा आढावा घेतला जाईल. यासोबतच शाळा, अंगणवाड्या, बाजारपेठा, धार्मिक स्थळे व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता देखील तपासली जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य तसेच ग्रामस्थांनी सर्वेक्षणामध्ये सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी  नेहा भोसले यांनी केले आहे

या सर्वेक्षणात गावांचे मूल्यांकन एकूण १००० गुणांच्या आधारे केले जाणार आहे. यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन – १२० गुण, ग्रामस्थांचा प्रतिसाद व मानसिकतेत झालेला बदल – १०० गु

स्वच्छता सुविधांचा वापर – २४० गुण, गावांची प्रत्यक्ष पाहणी व प्रश्नावली – ५४० गुण, मोबाईल अ‍ॅप व घरगुती सर्वेक्षणावर आधारित नागरिक अभिप्राय – प्रत्येकी ५० गुण, अशा विविध निकषांवर मूल्यमापन होणार आहे

“स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल” ही संकल्पना लक्षात घेता प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात दृश्यमान स्वच्छता टिकवण्यावर भर द्यावा, तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी व सार्वजनिक जागांची नियमित देखभाल करावी, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी  शुभांगी नाखले यांनी केले आहे.

०००000

संबंधित पोस्ट

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना  उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मानकापुरातील उपक्रमात हजारोंचा सहभाग; मुख्यमंत्र्यांनीही केली तीन शिवलिंगांची निर्मिती

दहावीच्या विद्यार्थ्याने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “डे विथ कलेक्टर” उपक्रम प्रसादच्या जिज्ञासू वृत्तीचे व या उपक्रमाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीची चळवळ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-जी विभाग ऐरोली कार्यालयामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक मोहिमेचे सुरुवात

रिपब्लिकन पक्ष- खोरीप मुंबई महानगरपालिका निवडणूक 20 26 करिता पक्षाच्या उमेदवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न