vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रिपब्लिकन पक्ष- खोरीप मुंबई महानगरपालिका निवडणूक 20 26 करिता पक्षाच्या उमेदवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न

रिपब्लिकन पक्ष- खोरीप मुंबई महानगरपालिका निवडणूक 20 26 करिता पक्षाच्या उमेदवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न

मुंबई प्रतिनिधी- सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यंदा रिपब्लिकन पक्ष खोरीपा यांनीही आपले उमेदवार मुंबईतील वेगवेगळ्या प्रभागात निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना घेऊन सर्व धर्म समभावाने लोकांना एकत्रित करत मुंबईतील जनतेला आवाहन केले आहे की रिपब्लिकन पक्ष खोरीप उमेदवारांना निवडणुकीमध्ये निवडून देण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ निर्भवणे यांनी केले आहे

मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या निवडणुकीकरिता रिपब्लिकन पक्ष खोरीपा प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ निर्भवणे मुंबई अध्यक्ष भागवत भाऊ कांबळे जिल्ह्याचे मान्यवर नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन केले

पक्षाच्या उमेदवारांना विभागात कशाप्रकारे प्रचाराचे कार्य नागरिक सुख सुविधा आणि त्यांचे प्रश्न कशाप्रकारे मांडावे  यांचे  मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच विभागातील जनतेचा पुनर्वसनाचा प्रश्न नाल्याचा प्रश्न विविध समस्या कशाप्रकारे सोडवल्या जाव्यात याबाबत ही सूचना करण्यात आल्या आहेत

तसेच प्रत्येक उमेदवारांनी आपली भूमिका काय असणार आहे तेही त्यांनी मांडले आहे

नागरिक समस्या विषयी असलेले अत्यावश्यक  सेवा म्हणजे मुंबई महानगरपालिका शौचालय पाणी आरोग्य आणि इतर योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मार्गदर्शन यावेळी केले आहे

यंदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष खोरीप यांचेही उमेदवार विजयी होतील अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली

निवडणुकीच्या या मार्गदर्शन बैठकीला  मुंबई संयोजक मुंबई अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि नेतेमंडळी मान्यवर मुंबई विभागातील सर्व उमेदवार उपस्थित होते

संबंधित पोस्ट

शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये- ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम

पोलीस विभागाने ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखलप्रलंबित प्रकरणे तात्काळ निर्गत करावीत – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

जिल्हास्तरीय N-CORD समितीची आढावा बैठक ठाण्यात 8.24 कोटींचा अंमली पदार्थांचा मोठा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला अनुमती नाकारली;हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश !दहशतवादाचे समर्थन करणारे असे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडा !- हिंदु राष्ट्र समन्वय समिती

मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दिंडोरीच्या घटनास्थळाची पाहणी

vishwatmaklokswamivarta