vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावी विभागात *सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ एकविरा मित्र मंडळ विभागातील नागरिकांसाठी मेडिकल शिबिराचे आयोजन

मुंबईतील धारावी विभागात *सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ एकविरा मित्र मंडळ विभागातील नागरिकांसाठी मेडिकल शिबिराचे आयोजन

 मुंबई प्रतिनिधी

-मुंबईतील धारावी विभागात *सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ एकविरा मित्र मंडळ विभागातील नागरिकांसाठी मेडिकल शिबिराचे आयोजन

धारावीतील नागरिकांसाठी आणि रहिवाशांसाठी एकविरा मित्र मंडळाच्या माध्यमातून खालील मेडिकल कॅम्प ज्येष्ठांच्या उपयोगासाठी व त्यांच्या जनजागृतीसाठी एकविरा मित्र मंडळाकडून आयोजित करण्यात आलेले आहेत. सदर कार्यक्रम मंडळाचे मंडपात होणार असून त्याचा लाभ येथील रहिवाशांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे

बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 पासून ते 1.30 वाजेपर्यंत* एकविरा मित्र मंडळाच्या सहकार्यातून वैद्यकीय मोफत शिबिर ज्यामध्ये रहिवाशांची, नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून, डॉक्टरांचा सल्ला व आवश्यक औषधे वेगवेगळ्या आजारावर देण्यात येतील व त्याच वाटप ही करण्यात येईल. सदर वैद्यकीय शिबिर हे 40 वर्षाच्या जास्त वय असलेल्या स्त्री आणि पुरुषांसाठी हा मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रम *केंद्रीय आयुर्वेदिय अनुसंधान परिषद, आयुष मंत्रालय (पोतदार हॉस्पिटल) वरळी मुंबई* यांच्या मार्फत एकविरा मित्र मंडळाच्या आवारात घेण्यात येणार असून त्याचा लाभ सर्व रहिवाशांनी घ्यावा ही नम्र विनंती…🙏🙏

सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी नऊ ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत* एकविरा मित्र मंडपाचे आवारात विभागातील रहिवाशांची नागरिकांची *मोफत कॉम्प्युटर द्वारे डोळे तपासणी शिबिर, चष्मा नंबर तपासणे, मोतीबिंदू तपासणी, रंगआंधळेपणा तपासणी व त्यावर करावयाचा उपाय* याकरिता माननीय *प्रोग्रॅम ऑर्गनायझर/ संचालक, आदित्य ज्योत नेत्रालय, वडाळा, मुंबई* यांचे मार्फत मोफत हा वैद्यकीय उपक्रम आयोजित केलेला आहे.

3. *मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत* एकवीरा नवरात्र उत्सवाच्या मंडपात विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी *ऑनलाईन सुरक्षिततेबद्दल माहिती सत्र, तसेच मोबाईल पासवर्ड कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती सत्र, याशिवाय ओला उबेर बुक करताना कोणती सुरक्षितता घ्यावी या सुरक्षितता टिप्स* सर्वांना समजून सांगून ज्येष्ठा मध्ये जनजागृती होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. येताना सर्वांनी मोबाईल घेऊन येणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाचे आयोजन *हेल्पएज इंडिया स्टेट प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर श्री सोहेल पठाण मार्गदर्शक* यांच्याद्वारे हा कार्यक्रम होणार आहे

उपरयुक्त सर्व कार्यक्रम हे एकविरा मित्र मंडळाच्या माध्यमातून मंडपाचे आवारातच आयोजित करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी व मुंबईतील वेगवेगळ्या संस्थांशी संबंधित असलेले *एकविरा मित्र मंडळाचे पदाधिकारी श्री दिलीप महादेव गाडेकर उपाध्यक्ष* यांच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य मंडळासाठी मिळालेल आहे.

संबंधित पोस्ट

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम- परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

vishwatmaklokswamivarta

पर्यटन संचालनालयाच्या नवीन योजनांमुळे देश-विदेशी पर्यटकांना आता शहरातही मिळणार “टुरीस्ट होम”

मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे 15 जुलैला

नव्या मुंबईत अतिक्रमण विभागामार्फत बेलापूर विभागात बेघर झोपड्यांचे निष्कासन करण्याची धडक मोहिम…

आजपासून रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ, वाचा नवे दर

vishwatmaklokswamivarta

जालना मनपाच्या विभागांना जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिला कालबद्ध कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta