vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना मनपाच्या विभागांना जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिला कालबद्ध कार्यक्रम

जालना मनपाच्या विभागांना जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिला कालबद्ध कार्यक्रम

जालना मनपावृत्त :मा. जिल्हाधिकारी तथा आयुक्त, जालना शहर महानगरपालिका श्रीमती आशिमा मित्तल यांनी दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील विविध विषयांवरील कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीदरम्यान शहराच्या सर्वांगीण विकास, स्वच्छता, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, तसेच प्रशासकीय कार्यक्षमता या संदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या गेल्या

आठवडी बाजारांचे स्थलांतर व नियोजन,शहरातील आठवडी बाजार आणि दैनंदिन बाजारामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक अडचणी आणि स्वच्छतेच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. प्रारंभी शुक्रवार आठवडी बाजाराचे स्थलांतर करण्यासाठी योग्य जागा निश्चित करून त्वरित कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या.

नाले व मॅनहोल झाकणांची तपासणी,शहरातील नाल्यांवरील ढापे/मॅनहोल झाकणांची स्थिती तपासण्यासाठी यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या ठिकाणी झाकण नाहीत, तिथे त्वरित बसविण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण कामासाठी विशेष एजन्सी नेमण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले

घाणेवाडी सोलार पॉवर प्रकल्पाची गती वाढविण्याच्या सूचना,घाणेवाडी सोलार पॉवर प्लांटच्या प्रगतीचा आढावा घेत आयुक्तांनी एक महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच, कामाच्या टप्प्याटप्प्याने पूर्ततेसाठी “डे-वाईज शेड्यूल” तयार करण्याच्या सूचना दिल्या

श्वान निवार केंद्र व नसबंदी उपक्रम,शहरातील विद्यमान डॉग शेल्टरची क्षमता वाढविण्यासाठी तसेच नवीन केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. श्वानांच्या सुरक्षेसाठी पिंजरे व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले.

मोकाट गुरांसाठी कोंडवाडा कार्यान्वित करण्याचा आदेश,शहरातील मोकाट गुरे/गायींसाठी बांधण्यात आलेल्या कोंडवाडा प्रकल्पास त्वरित कार्यान्वित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. प्रारंभी ५० ते ६० मोकाट गुरे पकडून कोंडवाड्यात टाकावीत, तसेच खाद्य व पाण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी, असेही निर्देश देण्यात आले.

कचरा संकलन वाहनांचे मेन्टेनन्स व तपासणी,घंटा गाड्या व स्वच्छता वाहनांचे मेंटेनन्स व कार्यक्षमता तपासण्यात आली. ज्या वाहनांनी काम केले नाही त्यांचे पेमेंट थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या

प्लास्टिक बंदी प्रभावी करण्यासाठी विशेष मोहीम,प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी ३ ते ४ दिवसांत विशेष टीम गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित सहाय्यक आयुक्त व स्वच्छता निरीक्षक यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी तथा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अंतिम बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले.

सामनगाव मिश्र कचरा प्रक्रियेसाठी व्यावसायिक एजन्सी नेमण्याचा प्रस्ताव,सामनगाव परिसरातील मिश्र कचऱ्याच्या पर्यावरणपूरक प्रक्रियेसाठी, महानगरपालिकेमार्फत “नो कॉस्ट टू म्युनिसिपल कॉर्पोरेशन” या तत्वावर काम करणारी व्यावसायिक एजन्सी नेमण्याचा प्रस्ताव देण्यात यावा.

अशा एजन्सीने कचरा प्रक्रिया, छाननी, जैविक-अजैविक विभाजन आणि पुनर्वापरक्षम घटकांची पुनर्प्रक्रिया महानगरपालिकेवर कोणताही आर्थिक भार न टाकता करावी, अशी अपेक्षा आहे.इच्छूक एजन्सींनी जालना महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मा. आयुक्त आशिमा मित्तल यांनी केले.AI प्रशिक्षण आणि प्रशासकीय पारदर्शकतामहापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच, वर्कशीट व कार्यविवरण नोंदवही काटेकोरपणे राखण्याच्या सूचना दिल्या.

अनधिकृत चिकन व मटन दुकाने बंद करण्याचा आदेश,शहरातील अनधिकृत चिकन व मटन दुकाने बंद करण्याचे तसेच २० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आलेLEAP आणि English Bee उपक्रमांतर्गत सेमी-इंग्रजी शिक्षजालना महानगरपालिका अंतर्गत २० शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

तसेच, विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढविण्यासाठी LEAP (Learn English Audio Programme) आणि English Bee या डिजिटल कार्यक्रमांचा वापर सर्व शिक्षकांनी करावा, अशा सूचना दिल्या गेल्या.

वॉटर सप्लाय प्रकल्पाच्या नियमित भेटीजलपुरवठा प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेऊन, संबंधित अभियंत्यांना दर २-३ दिवसांनी ठिकाणी भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेले.या बैठकीत अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपआयुक्त नंदा गायकवाड, सर्व सहाय्यक आयुक्त आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.#jalnacitymunicipalcorporation #jalnacity#ᴊᴀʟɴᴀ#jalnacollector

संबंधित पोस्ट

छत्तीसगड राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कठोरकायदा करणार मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन !हिंदु जनजागृती समिती व हिंदुत्वनिष्ठ यांची छत्तीसगडचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह बैठक..

vishwatmaklokswamivarta

प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्ती; 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

संजय गांधी विभागातील आयटी असिस्टंटच्या मानधन वाढीबद्दल पालकमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद

वारणा धरणात 25.31 टी.एम.सी. पाणीसाठा