vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्यात आगामी कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आदी सण, उत्सव तसेच शहरातील मिरवणुका व विविध कार्यक्रम आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि. 30 जुलै ते 12 ऑगस्ट 2025 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

           संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 30 जुलै 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

संसदीय राजभाषा समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट,यानंतर मराठी पत्रव्यवहाराला मराठीतून उत्तर

नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता1 डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार  

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने शिवसेनाप्रमुखांचा विश्वासू सहकारी गमावला  — उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

अमृत पेठ-2026 उद्योजक मेळाव्याला 6 मार्चपासून सुरवात..

अंतराळ संशोधन संस्थेतील शैक्षणिक सहलीसाठी  348 विद्यार्थ्यांनी दिली निवड चाचणी परीक्षा…

vishwatmaklokswamivarta