vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 31 जुलैची मुदत..

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 31 जुलैची मुदत..

            सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येत असलेले मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृह हे कासेगांव एज्युकेशन सोसायटी संचलित, राजारामबापू इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सांगली येथील मिरा हौसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली या संस्थेच्या इमारतीमध्ये सुरु आहे. वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 31 जुलै 2025 पर्यंत असून गरजू, होतकरू व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे वसतीगृह प्रमुख व कोल्हापूर विभागाचे विभागीय सहसंचालक (उ.शि.) तथा वसतिगृह प्रवेश समितीचे अध्यक्ष यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार असून वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या निवासाची व भोजनाची मोफत सुविधा पुरविली जाते. वसतिगृहात प्रवेशासाठी माध्यमिक विभाग (इयत्ता 8 वी 10 वी) 20 जागा, उच्च माध्यमिक (इयत्ता 11 वी व 12 वी) 30 जागा व महाविद्यालयीन विभाग (बी.ए.बी.कॉम. बी.एस्सी) 30 जागा अशा एकूण 80 जागा उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकृती 31 जुलै 2025 पर्यंत आहे.

प्रवेशकरीता लागणारी आवश्यक कागदपत्रे – विहीत नमुन्यात पूर्ण भरलेला प्रवेश अर्ज (शाळा/महाविद्यालयामध्ये प्रवेशाबाबत प्राचार्यांच्या प्रमाणपत्रासह), तहसिलदार यांच्याकडील सन 2024-25 या आर्थिक वर्षातील रु. १,००,०००/- पर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला (मूळप्रत), मागील परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रकाची सत्यप्रत, गाव कामगार पोलीस पाटील यांचा वर्तणुकीचा दाखला (मूळप्रत), गाव कामगार तलाठी यांचा रहिवाशी दाखला (मूळप्रत), मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीखेरीज) वसतिगृह कार्यालयामध्ये मिळतील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात3 हजार 953 उपक्रम राबविल्याची प्रथमच नोंदअप आधारित महाकृषी खरीप मोहिम यशस्वी..

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ई-केवायसीची गती वाढवावी- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी विनामुल्य एसएसबी प्रशिक्षण.

देशाच्या स्वातंत्र्यदिना बरोबर निरंकारी मिशनने साजरे केलेआत्मिक जागृतीचे पावन पर्व : मुक्ती पर्व भक्तीमध्ये स्वातंत्र्याची मुक्ती- निरंकारी राजपिता रमितजी

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार-(MahaVISTAAR-AI’) मोबाईल अपचा वापर करावे

vishwatmaklokswamivarta