vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच– उद्योग मंत्री उदय सामंत

शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच– उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी-

राज्यभरातील शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. .सदस्य सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री डॉ. सामंत बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला..  मंत्री श्री. सामंत म्हणाले की, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्ती वेतन योजना राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासून लागू केली. त्यानंतर २०१५ पासून ही योजना केंद्र शासनाच्या नवीन निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग करण्यात आली आहे. शिक्षकांना अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची बाब सध्या अर्थ विभागाच्या विचाराधीन आहे. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसेच महानगरपालिका व नगरपालिकांतील शिक्षकांनाही शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच लाभ मिळावेत यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

 

००००

संबंधित पोस्ट

आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार-मंत्री अतुल सावे

उद्योग प्रतिनिधींची बैठक -सामाजिक उत्तरदायित्व निधीची माहिती सादर करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नाफा २०२५ महोत्सवात यंदा भरगच्चं कार्यक्रम!-२५ ते २७ जुलै रोजी सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी तारेतारकांच्या उपस्थितीत रंगणार भव्य ग्लॅमरस मराठी चित्रपट महोत्सव!

vishwatmaklokswamivarta

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला  जिल्ह्यात १५ केंद्रांवर ३ हजार २२४ विद्यार्थी बसणार

vishwatmaklokswamivarta

दि.02 डिसेंबर रोजी आठवडा बाजार पूर्णवेळ राहणार बंद जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला बंदी आदेश

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताचे ध्येय साधण्यासाठी भारताची नवउद्योजकांचा देश ही ओळख निर्माण करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाचा २७ वा दीक्षान्त समारंभ थाटात

vishwatmaklokswamivarta