vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जन्माष्टमी निमित्त लोकभवनमध्ये भजनसंध्या

जन्माष्टमी निमित्त लोकभवनमध्ये भजनसंध्या

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकभवनातील दरबार हॉल भक्तिरसात न्हाऊन निघाला. जन्माष्टमीचे औचित्य साधून भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या भजनांचा कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला जलोटा यांनी कृष्ण भजनासह इतर लोकप्रिय भजन सादर केले.

कार्यक्रमाला अभिनेते शेखर सुमन, रुपिणी महुआकर, अंजन श्रीवास्तव, संध्या पुरेचा, ब्रह्माकुमारी रुक्मिणीबेन, रामकृष्ण मठातील स्वामी दयाधीपानंद, स्वामी कल्याणात्मानंद, न्या. के के तातेड (सेवानिवृत्त), न्या. मदन गोसावी (से.नि.), डॉ. नरेंद्र जाधव, संदीप सोपारकर, गायिका इला अरुण, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, सिद्धार्थ काक, विवेक वासवानी, संदीप महावीर, शांतिप्रिया आदी उपस्थित होते.

राज्यपालांनी अनुप जलोटा तसेच त्यांच्या सहकलाकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यपालांच्या खासगी सचिव अर्चना गायकवाड यांनी केले.

0000

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्यासाठी  25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबवा; ध्वज संहितेचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधि

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

vishwatmaklokswamivarta

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या १ हजार ७९५ यात्रेकरूंची २३ वी तुकडी पोलिस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना