vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हातमाग वारशावर आधारित फॅशन शो नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात उत्साहात संपन्न

हातमाग वारशावर आधारित फॅशन शो नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात उत्साहात संपन्न

नवी दिल्ली, प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या समृद्ध हातमाग परंपरेला आणि भारताच्या कलात्मक रंगछटांना एकत्र आणणारा फॅशन शो ‘रंग-रेषा : थ्रेड्स ऑफ महाराष्ट्र, कलर्स ऑफ इंडिया’ आज नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे उत्साहात संपन्न झाला.

विकास आयुक्त (हातमाग), महाराष्ट्र सदन आयोजित चार दिवसीय हातमाग साडी प्रदर्शनाअंतर्गत या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.

या फॅशन शोमध्ये तीन प्रमुख सादरीकरणांद्वारे महाराष्ट्राच्या वस्त्रसंस्कृतीचा आणि भारतीय कलात्मकतेचे अनोखे सादरीकण झाले. “ट्रायबल टू मॉडर्न आर्ट – एक भारत श्रेष्ठ भारत” भारतीय कलाशैलींनी प्रेरित हस्तचित्रांकित हातमाग साड्यांचे सादरीकरण करण्यात आले. “प्राईड ऑफ महाराष्ट्र” या सादरीकरणात अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि महिला अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे आकर्षक रॅम्पवरून घडविण्यात आले. तसेच “फ्रॉम द विव्हर्स ऑफ महाराष्ट्र” अंतर्गत पैठणी, हिमरू, खण, नारायणपेठी आदी पारंपरिक साड्यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले.

शिखाज् कारागिरी’ ब्रँडच्या हस्तचित्रांकित संग्रहाचे विशेष सादरीकरण यावेळी करण्यात आले. या फॅशन शोची संकल्पना प्रसिद्ध कलाकार शिखा अजमेरा यांची असून, दिग्दर्शन सेलिब्रिटी फॅशन डिझायनर संदेश नवलखा यांनी केले.

या उपक्रमातून विणकर, कारागीर आणि पारंपरिक वस्त्रसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, महाराष्ट्राच्या परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा हा उपक्रम ठरला आहे.

संबंधित पोस्ट

अमली पदार्थ विरोधात राज्यात आदर्श ठरेल असे मॉडेल राबवावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटीलअमली पदार्थ टास्क फोर्सच्या तिसऱ्या बैठकीत दिले निर्देश..

vishwatmaklokswamivarta

कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु

पावर फिटनेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त पंचमुखी महादेव मंदिरा मध्ये आज रोजी केशर दूध वाटप..

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषदलक्षवेधी—

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यावर कायमस्वरूपी अन्यायकारक ठरणारा गोदावरी अभ्यास गट 02 मांदांडे समितीच्या अहवालाच्या विरोधात जनजागृती अभियान – डॉ संजय लाखेपाटील

विठ्ठल नामाचा गजर… महाराष्ट्राच्या संतपरंपरेची रोमेनियामध्ये भक्तीमय झलक!”🚩