vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई, प्रतिनिधी : आदिवासी विकास विभाग, अपर आयुक्त, ठाणे विभागाअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई, उपनगरात आदिवासी मुलांचे एक व आदिवासी मुलींचे एक अशी दोन शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत. या वसतिगृहात अनुसुचित जमातीच्या प्रवर्गातील रिक्त असलेल्या जागांवर २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी स्वयंम पोर्टल सुरू करण्यात आले असून वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, मुंबई यांनी केले आहे

२०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षाकरिता मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुला-मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय तसेच व्यावसायिक , बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम, बी.ए. बी कॉम, बी.एस. सी, पदवीका, पदवी आणि पदवीनंतरचे पदव्युत्तर पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रमातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी आनलाईन प्रवेश अर्ज https://swayam.mahaonline.gov.in या पोर्टलवर केल्यानंतर रिक्त जागांवर निकषानुसार प्रवेश देण्यात येईल.

त्यानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगरातील, अनुसूचित जमातीच्या मुला/मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यानी https://swayam.mahaonline.gov.in पोर्टल लिंकचा वापर करून अर्ज भरावे, काही अडचणी उद्भवल्यास स्थानिक गृहपाल अथवा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेत असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे

0000

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृह परिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध …

vishwatmaklokswamivarta

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सोमवारीअमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली

बेकायदेशीर शुल्कवाढ नियमांत दुरुस्ती करण्यात येणार- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्याकामकाजाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा..

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या पात्र उमेदवारांना माहिती सादर करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची मुदत; गुणपडताळणीही उपलब्ध

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’