vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृह परिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध …

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृह परिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध …

 जालना, प्रतिनिधी:- राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे,रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डीग्जइ.लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादीबाबी नियंत्रीत करणे आवश्यक आहे. ज्या अर्थी सर्व संबंधीतांना नोटीस देवून त्यांचे म्हणने ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये उक्त ठिकाणी आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत वरीलप्रमाणे कृती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तहल यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्हा व सत्र न्यायालयातील वापरात नसलेल्या वस्तुंचा 24 जुलै रोजी लिलाव

पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धाडसी छापा सात अटक — कोकेन, गांजा, हुक्का, दारू आणि इतर अंमली पदार्थ जप्त.

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरण अभियान; महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा    ‘विधवा’नव्हे ‘पुर्णांगिनी’म्हणा- रुपाली चाकणकर…

vishwatmaklokswamivarta

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती

विदेशी गुंतवणूकीसाठी ‘महाराष्ट्र’ भारताचा गेट वे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान; डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला मराठीसाठी पुरस्कार देशातील २४ भाषांतील बालसाहित्यिकांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta