vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती

जालना प्रतिनिधी शहरातील अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत महाआरती पार पडली. या प्रसंगी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सपत्नीक उपस्थित राहून महाआरती केली व केंद्रातील सेवेकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.कार्यक्रमादरम्यान सेवेकऱ्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचे आणि केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. श्री स्वामी समर्थ यांच्या विचारांचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडत असून श्रद्धा, सेवा आणि एकतेची भावना अधिक बळकट होते.

महाआरतीनंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या, केंद्राच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असून भविष्यातही हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सातत्याने सुरू ठेवावे, कार्यक्रमाच्या शेवटी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि जालना शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना केली, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास केंद्रातील पदाधिकारी, सेवेकरी तसेच परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवांना,जातवैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय लवकरच- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सिंधुदुर्गातील आदिवासी ठाकर समाजाला जात वैधता प्रमाणपत्रदेण्याबाबत निर्णय घेण्याची मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मागणी

सत्याचा विजय’; मात्र षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा झाल्यावरच संपूर्ण न्याय मिळेल ! – सनातन संस्थेची भूमिका…

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात ‘श्री गणेशा’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख : महिला आर्थिक विकास महामंडळ ; महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा.