vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत धारावी रामरवाडी तील घटना-  एका बेकायदेशीर बांधकामाचे भिंत कोसळून:2 कामगार  गंभीर जखमी सायन रुग्णालयात दाखल, महानगर पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

मुंबईत धारावी रामरवाडी तील घटना-  एका बेकायदेशीर बांधकामाचे भिंत कोसळून:2 कामगार  गंभीर जखमी सायन रुग्णालयात दाखल, महानगर पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

 

 मुंबई प्रतिनिधी मुंबईतील धारावी विभागात भर मुसळधार पावसामध्ये एका तीन माळ्याचे बेकायदेशीर बांधकाम चालू असताना बाजूची एक भिंत कोसळून. दोन कामगार अति गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हातापायावर बाजूची मोठी भिंत आणि लोखंडी अँगल कोसळल्याने त्यांना ताबडतोब सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आजूबाजूच्या रहिवाशांनी आणि तेथील समाजसेवकांनी रुग्णालयात दाखल केले आहे

 प्राप्त माहितीनुसार मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांच्या हद्दीतील धारावी विभागात, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाही धारावीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामाला  उत  आला आहे

 प्रभाग क्रमांक 187 मध्ये धारावी पोस्ट ऑफिस धारावी मेन रोड येथील रामरवाडी येथे धारावीतील कुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर मूष्पिक बिहारी आणि त्याचे साथीदार रामरवाडीतील गल्लीमध्ये व्यावसायिक आणि घराचे बेकायदेशीर बांधकाम करत असताना काल दिनांक 22 /7/26 रात्री तीन माळ्याच्या बेकायदेशीर बांधकाम करत असताना बाजूला असलेली भिंत कोसळली सोबत लोखंडी अँगल ही अंगावर पडले याच्यामध्ये गंभीर रित्या दोन कामगार जखमी झाले दरम्यान धारावी रामरवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येऊन दोन कामगारांना बाहेर काढून सायन रुग्णालयात माध्यमातून अंबुलन्स च्या माध्यमातून त्यांना रुग्णालयात दाखल केले

 धारावीतील प्रभाग क्रमांक 187 याचे मुकादम पोळ आणि वाघ हे दुपारीच येथील अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला भेटून गेले होते परंतु कॉन्ट्रॅक्टर मुसिक बिहारी प्रत्येक बांधकामाकरिता हे दोन मुकादम प्रत्येक धारावीतील कॉन्ट्रॅक्टरच्या भेटीगाठी करत आहेत आणि धारावीतील अनाधिकृत बांधकामाला वाढवत आहेत कोणी मरो कोणी जखमी हो आम्हाला काही देणे घेणे नाही आम्हाला फक्त अनाधिकृत बांधकामाचा मलिदा पाहिजे आहे अशाच मुकादम मुळे धारावीतील अनाधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झोपवली आहेत आजच्या घडीला धारावी मध्ये सर्व ठिकाणी बांधकाम सुरू आहे धारावी कुंभारवाडा येथे कॉन्ट्रॅक्टर कमलेश वारिया याचे पाच बांधकामे सुरू आहेत तर धारावीतील इतर कॉन्ट्रॅक्टर यांचे धारावीतील वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे सुरू आहेत परंतु मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांचे सहाय्यक पालिका आयुक्त देसाई आणि त्यांचे संबंधित अधिकारी धारावीतील अनाधिकृत बांधकामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि ते धारावी पुनर्वसन प्रकल्प यांच्या अधिकाऱ्यावर ढकलतात याचमुळे अशा अनाधिकृत बांधकाम वाढीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना समोर येत आहेत या संबंधित दोषी असणाऱ्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टर मुकादम यांच्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करणार का असा प्रश्न धारावीकरांनी विचारला आहे

 याबाबत पालिका मुख्यालय डिझास्टर कंट्रोल रूम 1916 यांना सदर माहिती देण्यात आली आहे सदर पालिका याबाबत तक्रार नोंदवून घेतली असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते

संबंधित पोस्ट

श्री क्षेत्र धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन; सुमारे ५० हजार भाविक येण्याचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

बाळासाहेब तनपुरे यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 

कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन विकासासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने काम करण्याचा निर्धार

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

vishwatmaklokswamivarta

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या ‘गट ब व क’ सेवा संयुक्त पुर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल…