vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माणगांव येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात  संपन्न२,७४८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ, अनाथ लाभार्थ्यांत पोलीस शिपाई पदीनिवड झालेल्या युवकाचा विशेष सन्मान !

माणगांव येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात

 संपन्न२,७४८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ, अनाथ लाभार्थ्यांत पोलीस शिपाई पदीनिवड झालेल्या युवकाचा विशेष सन्मान !

 राज्य प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार, जनतेच्या दारी कल्याणकारी योजनांचा लाभ थेट पोहोचवण्यासाठी माणगांव येथील ज. गांधी मेमोरिअल सभागृहात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अत्यंत उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात भव्य शिविराचे आयोजन करण्यात आले होते.सदर भव्य शासकीय कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ह्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रशांत शिंदे, संपर्क प्रमुख, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान, १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हे उपस्थित होते.

 या कार्यक्रमास मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनाथ लाभार्थ्यांचा सत्कार :सदर शिबिरामध्ये एकूण २,७४८ नागरिकांना निरनिराळ्या योजनांचा लाभ मंजूर करण्यात आला, ज्यातील १०६ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर मान्यवरांच्या हस्ते लाभ सुपूर्द करण्यात आले, तसेच यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या सुचनेनुसार, समाजातील वंचित व दुर्लक्षित घटक असलेल्या अनाथ घटकाला प्राधान्याने लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या अनुषंगाने तालुक्यांतील ढालघर येथील रहिवासी ओंकार अनिल शिंदे या युवकास माणगांव प्रशासनाने तत्परतेने अनाथ प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. या प्रमाणपत्राच्या आधारे अनाथ समांतर आरक्षणांतर्गत ओंकार शिंदे यांची मुंबई पोलीस विभागात पोलीस शिपाई पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल मंत्री ना.आदिती तटकरे यांच्या हस्ते शिबिरात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

 महसूल विभाग : महसूल विभागामार्फत सर्वाधिक नागरिकांना विविध दाखले व योजनांचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये १,५८८ नागरिकांना जात प्रमाणपत्र, डोमिसाईल, उत्पन्न दाखले, ई. प्रमाणपत्र, ३९७ शेतकऱ्यांना जिवंत ७/१२ मोहिमेतंर्गत सुधारित ७/१२, ६७ शेतकऱ्यांना अग्रीस्टॅक कार्ड, ६१ लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचे मंजुरी आदेश, ५३ कुटुंबांना नवीन रेशन कार्ड, २७ नागरिकांना जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकृत आदेश, ३ महिलांना जमिनीवर हक्क मिळवून देत लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ, देण्यात आले आहे. पंचायत समिती व शिक्षण विभाग:स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ११ महिला बचत गटांना वैयक्तिक व्यवसायासाठी आर्थिक अनुदान देण्यात आले तसेच शिक्षण विभागामार्फत ११ गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व ३७ लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा वाटप करण्यात आले.

 

तालुका आरोग्य विभाग :आरोग्य सेवेचा विस्तार करण्यासाठी २२१ नागरिकांना आभा कार्ड आणि आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. नगरपंचायत विभाग माणगांवशहरी भागातील बेघर व गरजू नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी दिली तसेच शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ३५ आदिवासी कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला. एस.टी. महामंडळ माणगांव आगार :प्रवाशांच्या सुविधेसाठी एस.टी. महामंडळाकडून ४८ नागरिकांना N.C.M.C. स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. तालुका कृषी विभाग :कृषी विभागामार्फत ४६ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना व इतर कृषी योजनांचे लाभ देण्यात आले. भूमि अभिलेख कार्यालय :जमिनीच्या मोजणीशी संबंधित ४७ नागरिकांना मोजणीची सनद सुपूर्द करण्यात आली. एकात्मिक बाल विकास प्रकल्प :महिला व बाल कल्याणासाठी विविध उपक्रम राबवून लेक लाडकी व प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत २५ माता व बालकांना योजनेचा लाभ देण्यात आला. ५ लाभार्थ्यांना पूर्व शालेय कोट्स वाटप, ३ नवजात बालकांच्या मातांना बेबी केअर किट सुपूर्द करण्यात आले.शासकीय योजनांचा लाभ थेट आणि जलद गतीने तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश असून, आजच्या या भव्य शिबिरास श्रीवर्धन मतदारसंघातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संबंधित पोस्ट

मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा-मराठीभाषेत ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

🌱पुस्तोला क्लस्टरमध्ये एकात्मिक शेती पद्धतीसाठी नाबार्डकडून ४.४७ कोटींचा प्रकल्प मंजूर 🌱💰मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आदिवासी भागात शाश्वत उपजीविकेला चालना

शेतीच्या व्यवहरातुन फसवणूक केल्या प्रकरणाी तालुका पोलीस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…

भीमाशंकर, अष्टविनायक मंदिरांसह शेकडो प्रमुख देवस्थानांचा कायद्याच्या विरोधात रणशिंग!**राज्यभर घंटानाद, महाआरती, स्वाक्षरी अभियान, तसेच मुंबईतून महाआंदोलनाचा सरकारला इशारा!**जमिनी वाचल्या, तरच देवस्थाने सुरक्षित राहतील* – मंदिर विश्वस्तांचे ठाम मत …

विपश्यना केंद्र, सांस्कृतिक भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण