vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांचा महासभेत सत्कार महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते कमिटीचा सन्मान

ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांचा महासभेत सत्कार

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते कमिटीचा सन्मान

      ठाणे, प्रतिनिधी  :- ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप शिंदे यांचे प्रातिनिधिक स्वरूपात ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सन्मानित केले. यावेळी त्यांनी सर्व विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, मनोज शिंदे, भरत चव्हाण, दीपक जाधव, संजय भोईर, नगरसेविका मीनल संख्ये, उषा वाघ, गटनेते अभिजीत पवार उपस्थित होते.

या निवडणुकीत विजयी झालेले ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप शिंदे, कार्याध्यक्ष दीपक शेलार, उपाध्यक्ष निलेश मंडलीक, सरचिटणीस राजीव डाके, सहचिटणीस प्रसाद सकट, खजिनदार राजेश शेटकर, कार्यकारिणी सदस्य निकेश शार्दुल, गजानन हरिमकर, सचिन देशमाने, अमर राजभर, प्रफुल्ल गांगुर्डे, नितिन दूधसागर, कार्यकारिणी सदस्य (महिला) सारिका साळुंखे यांचा सन्मान महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महापौर दालनात करण्यात आला.

तसेच ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप शिंदे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सर्वसाधारण सभेत महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे आदी उपस्थित होते.

0000000000

संबंधित पोस्ट

डॉ. अगरवाल हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत डोळे तपासणी शिबिर

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

जिल्हयात कृषी विभागा मार्फत कृषी तंत्रज्ञान शेतका-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकाऱ्यांच्या बांधावर

अवैध सावकारांकडील 74 हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत 55 प्रकरणांत गुन्हे दाखल 651 प्रकरणांची चौकशी पूर्ण…

vishwatmaklokswamivarta

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अनेक पदकं मिळवून जागतिक स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणारी पुण्याची लेक, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर आर्या अश्विनी सागर भागवत हिचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार केला शुभेच्छा दिल्या

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईत निधन, संगीत क्षेत्रातील चिरतरुण सूर हरपला, सर्वत्र शोकभावना.♦️आशा भोसले यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.