माणगाव येथील- रेड्डीज हॉटेल ते ढालघर फाटा, निजामपूर नाका ते कालवा रोड, मोर्बा नाका ते पवार वाडा हॉटेल तसेच इंदापूर येथील- माहि हॉटेल ते कशेने बायपास या मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे.

राज्य प्रतिनिधी-पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड-अलिबाग यांच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र शासन गृहविभागाच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५, ११६ (१) (अ) (ब), ११७ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ अन्वये पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी हा आदेश जारी केला आहे.
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान, जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच व्यवस्थापनाच्या अधिकृत पासधारक वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.गणेशभक्त व वाहनचालकांनी प्रशासनास सहकार्य करून निर्धारित ठिकाणी वाहने पार्क न करता वाहतूक सुरळीत ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.