vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

एका आईचा हात… दुसऱ्या आईसाठी पुढे सरसावला”नवजात कन्येचा पहिला प्रवास ठरला खास, मुंबईच्या महापौरांच्या वाहनातून घरी आगमन…

“एका आईचा हात… दुसऱ्या आईसाठी पुढे सरसावला”नवजात कन्येचा पहिला प्रवास ठरला खास, मुंबईच्या महापौरांच्या वाहनातून घरी आगमन…

मुंबई प्रतिनिधी-पावसाच्या सरी कोसळत असताना, सोबतीला जोरदार वारा वाहत असताना, घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर एक आई आपल्या नवजात कन्येला घेऊन उभी होती. घरी जाण्याची घाई, हातात बाळ आणि तासभर वाट पाहूनही त्या दाम्पत्याला रिक्षा मात्र मिळत नव्हती.

🔷अशा वेळी, रुग्णालयातील पाहणी दौरा आटोपून बाहेर पडताना, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी त्या नवजात कन्येचा रडण्याचा आवाज ऐकला. तिच्या आईच्या डोळ्यांतली काळजी पाहून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी तिची विचारपूस केली. प्रसंग लक्षात येताच, क्षणाचाही विलंब न लावता महापौर श्रीमती तावडे यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.

🔷एक महिला म्हणून एका आईची वेदना त्यांनी तात्काळ ओळखली. महापौर श्रीमती रितू तावडे यांनी त्या बाळंतिणीला आणि तिच्या कन्येला स्वतःच्या महापौर वाहनात बसवले आणि सुरक्षितपणे खैरानी मार्ग (कुर्ला) येथे घरी पोहोचवले. वाहनात स्वतः नवजात कन्येला कुशीत घेऊन घरी जाताना तिला आईकडे सोपवले आणि भरभरून शुभेच्छा दिल्या, मातृ भावनेने आशीर्वाद दिला. आज सायंकाळी हा प्रसंग घडला.

🔷जन्म झाल्यानंतर रुग्णालयातून पहिल्यांदाच घराकडे निघालेल्या त्या चिमुकलीचा हा पहिला प्रवास थेट महापौरांच्या वाहनातून झाला, हा क्षण त्या बाळंतिणीसाठी, तिच्या कुटुंबासाठी भावनिक आणि संस्मरणीय ठरला. असा योग अत्यंत दुर्मीळ असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली.

🔷महापौरांनी त्या बाळाला प्रेमाने भेट देत तिचे स्वागत केले. तर आईला शुभेच्छा देत तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवले. या कृतीतून ‘कन्या हीच शक्ती’ आणि ‘माणुसकी हाच धर्म’ हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला. त्याचप्रमाणे, या प्रसंगाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मोठेपण पदात नसते, ते मनात असते. मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आपल्या कृतीतून ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

संबंधित पोस्ट

सातारा जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जलसुरक्षेचा संकल्प

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट* 

बीड जिल्ह्यात देवगाव इथे शेकडो वर्ष जुन्या खंडोबा जत्रेला सुरवात, या निमित्त रंगला कुस्त्यांचा सामना.

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

साथी पोर्टल कार्यप्रणाली व कीटकनाशक हाताळणीविषयी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात-मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta