vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सिपेट अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात…

सिपेट अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात…

 

       अमरावती, प्रतिनिधी : केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट), रसायन व पेट्रोरसायन विभाग, रसायन व खते मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेली राष्ट्रीय स्वायत्त संस्था असून महाराष्ट्रातील प्लास्टिक उद्योगांना तांत्रिक सहाय्य, कुशल मनुष्यबळ निर्मिती तसेच संशोधन व विकास कार्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथे सिपेट केंद्राची स्थापना सन 2006 मध्ये करण्यात आली आहे. सिपेट संस्था आयएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त असून येथे एआयसीटीई, मान्यताप्राप्त व एमएसबीटीई समतुल्य प्लास्टिक इंजिनीयरिंगचे विविध अभ्यासक्रम राबविले जातात.

     सिपेटमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी ऑल इंडिया लेव्हल सिपेट अँडमिनीस्ट्रेटर टेस्ट आयोजित करण्यात येते व गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, सिपेट प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी

   https://cipet26.onlineregistrationform.org/CIPET/ या संकेतस्थळावर सुरु आहे. ही प्रवेश परीक्षा दि. 7 जून 2026 रोजी घेण्यात येणार असून प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 28 मे 2026 आहे.

     यावर्षी दहावी, बारावी, डिप्लोमा व बी.एस्सी. (अंतिम वर्ष)ची परीक्षा देणारे विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा न करता प्रवेश अर्ज भरू शकतात. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिपेटचे प्रशिक्षण प्रमुख आर. जीवन राम यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील-श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावरWAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा…

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे लोकभवन येथे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

♦️मुंबईत मानखुर्द येथे तीन मजली चाळीतली दोन-तीन घरं कोसळून सहाजणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर.

पंतप्रधानांनी सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान प्रमुख सीईओंशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta