vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

 

​शिर्डी, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक येत आहे. औद्योगिकदृष्ट्या जिल्ह्याला मुख्य केंद्र बनविण्याच्या उद्देशाने आवश्यक ती कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

​जिल्ह्यातील शिर्डी, राहुरी व श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक वसाहतींच्या संदर्भात मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरात औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीसंदर्भातील सर्व अडचणी दूर करून प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीबरोबरच राहुरी व श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीसाठी कार्यवाही करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी सूचित केले. राहुरी तालुक्यात कृषी विद्यापीठाची जागा औद्योगिक विकासासाठी मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या औद्योगिक वसाहतींमुळे अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वाढत असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा जिल्ह्याला मोठा लाभ होत आहे. या औद्योगिक विस्तारामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

0000000

संबंधित पोस्ट

नमुंमपा शाळेतील माजी विद्यार्थिनी पश्चिम विभागाची कर्णधार फुटबॉलपटू राबिया शेख यांचा आयुक्तांनी केला विशेष सत्कार…

vishwatmaklokswamivarta

वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली,

फसव्या भरती संदेशापासून सावधान; आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक१५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांना सुवर्णसंधी

जिल्हाधिकारी कार्यालयात सदविचारांचे वाण-सणांद्वारे संवाद आणि संस्कार वृद्धिंगत व्हावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे अनावरण