vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पंतप्रधानांच्या शुभहस्ते २० जूनला ‘पी.एम. किसान’च्या २३ व्या हप्त्याचे वितरण देशभरात साजरा होणार ‘किसान उत्सव दिवस’

पंतप्रधानांच्या शुभहस्ते २० जूनला ‘पी.एम. किसान’च्या २३ व्या हप्त्याचे वितरण देशभरात साजरा होणार ‘किसान उत्सव दिवस’

ठाणे प्रतिनिधी- केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (पी.एम. किसान) योजनेचा २३ वा हप्ता येत्या २० जून २०२६ रोजी वितरित करण्यात येणार आहे. माहे एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीतील या हप्त्याचे वितरण मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून थेट हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) केले जाईल. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून केंद्र सरकारने २० जून २०२६ हा दिवस संपूर्ण देशभरात ‘पी.एम. किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

 

फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेच्या निकषांनुसार, सर्व पात्र शेतकरी कुटुंबाला (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) प्रति वर्ष एकूण ६,००० रुपयांचा लाभ दिला जातो. ही रक्कम २,००० रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी एकूण २२ हप्त्यांमध्ये सुमारे ४१,०८३ कोटी रुपयांचा लाभ यशस्वीपणे वितरित करण्यात आला आहे. आता या २३ व्या हप्त्यांतर्गत राज्यातील एकूण ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे १,८१७ कोटी रुपयांची रक्कम थेट जमा होणार आहे.

 

केंद्र शासनाने या योजनेच्या पारदर्शक आणि सुलभ लाभासाठी काही महत्त्वाच्या अटी व बाबी बंधनकारक केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांनी आपली भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. यासोबतच चालू हप्त्यापासून लाभार्थ्याकडे ‘फार्मर आय.डी.’ असणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यातील ज्या ९०.८५ लाख शेतकऱ्यांनी या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली आहे, केवळ त्यांनाच २० जून रोजी हा लाभ मिळणार आहे.

 

या देशव्यापी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध असणार आहे. महाराष्ट्रात सर्वदूर कृषी विभाग, महसूल व वने विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तर, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विविध शासकीय कार्यालये, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs), शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि सहकारी पतसंस्था (PACS) या ठिकाणी हा सोहळा थेट पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नागरिक नागरी सुविधा केंद्रांवरूनही (CSC) या थेट प्रक्षेपणात सहभागी होऊ शकतात. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आणि भगिनींनी या लिंकचा वापर करून डिजिटल माध्यमातून या मुख्य सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पुणे कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या देशभरातील अनेक टोळ्या डीआरआयने आणल्या उघडकीस देशभरात संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये 440 हून अधिक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले किंवा संरक्षित वन्यजीव तसेच सुमारे 15 किलो हस्तिदंती वस्तू आणि हस्तिदंत जप्त; 33 जणांना अटक

vishwatmaklokswamivarta

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार -पालकमंत्री जयकुमार रावल

अमरावती जिल्ह्यासाठी ‘आधारभूत’ खरेदी केंद्रांना मंजुरी;शेतकऱ्यांना तातडीने नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी लावणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

बहुराष्ट्रीय जबील कंपनीकडून आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण; विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये नोव्हेंबर महिन्यात 1.40 लाख दंडात्मक वसूली व 46.5 किलो प्लास्टिक जप्त

vishwatmaklokswamivarta