
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मुंबईच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनाला चालना मिळणार वैभव संगोपन योजनेंतर्गत शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे संगोपनासाठी; वरळी किल्ल्याच्या संवर्धनासाठीही प्रयत्न· बाणगंगा, वरळी कोळीवाडा आणि शिवडी किल्ल्यात वारसा जतनासोबत महिला सक्षमीकरणावर भर
मुंबई, प्रतिनिधी : मुंबईचा समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरांचा वारसा जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने वारसा संवर्धनाच्या उपक्रमांना चालना मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार आरपीजी फाउंडेशनने शिवडी किल्ला संगोपनासाठी दत्तक घेतला आहे. याच योजनेच्या माध्यमातून वरळी किल्ल्याच्या संवर्धनालाही चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, स्थानिक संस्कृतीचे दस्तऐवजीकरण, नागरी सुविधांमध्ये सुधारणा आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगारनिर्मिती, अशा विविध अंगांनी मुंबईच्या वारशाचे जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.



