vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड 

२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी सावित्रीमाई फुले स्मृतिदिन, जागतिक महिला दिन व प्रा. सतेश्वर मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित २ रे वैदर्भीय आंबेडकर महिला संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.

हे संमेलन दि. ८ मार्च २०२६ (जागतिक महिला दिन) रोजी नेर, जि. यवतमाळ येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन संस्थापक सदस्य दलित पँथर, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचे इतिहासकार व विचारवंत ज.वि. पवार यांच्या हस्ते होणार आहे.

प्रा. डॉ. रेखा मेश्राम या रमाई फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. रमाई फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आयोजित करतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्या रमाई मासिकाच्या संपादक आहेत. रमाई मासिक हे केवळ महिलांसाठी चालविले जाणारे मासिक आहे. या मासिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक महिला लिहित्या करून कवी, लेखक म्हणून पुढे आणल्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संबंधित पोस्ट

अगस्ति ऋषी मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून अगस्ति ऋषी मंदिर सभामंडप आणि संरक्षक भिंत कामांचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

कर्मचारी समाधान शिबिरात 5 अर्ज दाखल

मालमत्ता कर पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया कायद्यानुसार;नागरिकांना आक्षेप नोंदविण्याची संधी– राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी बीडच्या विकासाला नवी गती; १७ सप्टेंबरला रेल्वेची पुण्याशी तर डिसेंबरमध्ये मुंबईशी जोडणी कालबद्ध आराखडा तयार करून युद्ध पातळीवर काम करण्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

देशातील युवा परदेशात जातोय… हे थांबलं पाहिजे – सपा राज्य उपाध्यक्ष जोशी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन…