vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय…

मुंबई, प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४४९ वसतिगृहांपैकी ४१६ वसतिगृहांच्या नावांना तसेच यापुढे सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या मुलांच्या वसतिगृहांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह” आणि मुलींच्या वसतिगृहांना “सावित्रिबाई फुले शासकीय वसतिगृह” अशी नावे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे.

सध्या अनेक वसतिगृहांच्या नावांमध्ये ‘मागासवर्गीय’ हा शब्द वापरण्यात आला आहे. ‘मागासवर्गीय’ हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करतो व त्यातून विषमता अधोरेखित होते. त्यामुळे संस्थांची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते आणि समाजाचा दृष्टिकोनही त्यानुसार घडतो. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहांच्या नावातील ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळून त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात विभागांतर्गत एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून त्यामध्ये २३१ मुलांची व २१८ मुलींची वसतिगृहे आहेत. या सर्व वसतिगृहांमध्ये एकूण ४६,६७३ विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामध्ये २४,९५८ मुलांची आणि २१,७१५ मुलींची प्रवेश क्षमता आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी ही योजना राबविण्यात येत असून त्यांना निवास व्यवस्था, नाश्ता, दोन वेळचे जेवण, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, मुलींसाठी स्वच्छता भत्ता, गणवेश, वैद्यकीय साहित्य, रेनकोट, गमबूट, क्रीडा साहित्य, शैक्षणिक सहली, कार्यशाळा तसेच टीव्ही, अक्वागार्ड, वॉटर कुलर आणि फायर फायटिंग यांसारख्या सुविधा पुरविण्यात येतात.

याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

 

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यातील 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय-सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी..

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोणार सरोवर विकास कामाला वेग देण्याच्या सुचना: विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केली पाहणी

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा ,वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्पउभारावेत, वॉररुमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा, बीडीडी चाळ वासियांना लवकरच सदनिकांचे वाटप…

आरोग्यविषयक सर्व माहिती आभा कार्डद्वारे डिजिटल स्वरुपात – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड• राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारण विभागाच्या विविध विषयांचा आढावा