vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर

२३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील..

कोल्हापूर, प्रतिनिधी: इराण आणि इस्रायल या देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत कोल्हापूर जिल्ह्यातील काही नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क आहेत, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

आखाती देशांमध्ये अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षित सुटका आणि त्यांच्या घरवापसीसाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने तिकडे अडकलेल्या नागरिकांशी सतत संपर्क ठेवावा. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयाने जिल्ह्यातील अडकलेले नागरिक, पर्यटक, नोकरीनिमित्त गेलेले व्यक्ती आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीचे नियोजन केले जात आहे. ज्यांचे कुटुंबीय परदेशात अडकले आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये. ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत, त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी. जिल्ह्यात यासाठी स्वतंत्र संपर्क कक्ष व विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आवश्यक मदतीसाठी सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे: यामध्ये दुबई येथे पर्यटनासाठी गेलेले १५९ पर्यटक; कतार, दुबई, इराण, इस्रायल, मोरोक्को, सौदी अरेबिया, शारजाह, कुवेत, बहरीन आणि ओमान येथे नोकरीनिमित्त गेलेले ३९ नागरिक; कतार, शारजाह व बहरीन येथे नोकरीनिमित्त गेलेल्या कुटुंबातील ७ सदस्य आणि दुबई येथे शिक्षण व प्रशिक्षणासाठी गेलेले २ असे एकूण २०७ नागरिक अडकले आहेत. यांपैकी पर्यटनासाठी गेलेले २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. तर दि. ५ मार्च २०२६ रोजी ८० नागरिक दुबईहून निघणार असून ते ६ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यात पोहोचतील.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी माहिती दिली की, प्रशासन परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सतत संपर्कात असून, याबाबतचा दैनंदिन आढावा घेऊन शासनास कळविण्यात येत आहे.

****

संबंधित पोस्ट

महात्मा गांधी तंटामुक्त योजना मोहीम  नव्या रूपात! राज्य सरकार सादर करणार 

vishwatmaklokswamivarta

दाक्षिणात्य अभिनेता सूर्या आणि अजय देवगन यांना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

vishwatmaklokswamivarta

पाल’ देवस्थानला पर्यटन स्थळासाठी प्रस्ताव सादर करावा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

दैनिक जगमिञ’चे संपादक संतोष भुतेकर यांना देवुन शिवराळ भाषेत आई-वडीलांवर शिवीगाळ केल्या प्रकरणी सोमनाथ जळगांव येथील शिवाजी गायकवाड या आरोपी विरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

पशुसंवर्धन विभागाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्वाचे पाऊल पशुधन विकास अधिकाऱ्यांची २७९५ पदे भरणार..

प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार- केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान,कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याकरिता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे महत्त्वाचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta