vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

             सांगली, प्रतिनिधी) : सामाजिक न्याय विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली या कार्यालयाच्या अधिनस्त 11 मुलांची व 10 मुलींची शासकीय वसतिगृहे प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची वसतिगृहांची प्रवेश-प्रक्रिया https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवरती सुरु असून विद्यार्थ्यांचे अर्ज पोर्टलव्दारे स्विकारण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी/विद्यार्थीनीनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सांगलीचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी/विद्यार्थिनींना मोफत प्रवेश दिला जातो. मुलां/मुलींना सुसज्ज शासकीय इमारतीमध्ये निवास, निवास साहित्य, भोजन इत्यादी सुविधा मोफत दिल्या जात असून विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाकरीता सुसज्ज अद्ययावत ग्रंथालय, व्यायामशाळा, मनोरंजन कक्ष, ई-लायब्ररी इत्यादी सोयी-सुविधेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याच प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून  मोठी  ऐतिहासिक आनंदाची बातमी -भारतीय भूमीवर जन्मलेल्या ‘गामिनी’ने दिला ४ बछड्यांना जन्म 🇮🇳

शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

धानाकरिता १३०६.४६ कोटी व भरडधान्यकरिता२१.८४ कोटी निधी वितरितखरीप हंगाम २०२५–२६ अंतर्गत धान/ भरड धान्य खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध.

vishwatmaklokswamivarta

खटाव याथील मुलींच्या शासाकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरु*

मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा पुढाकार : ‘आदिशक्ती अभियान’ आणि ‘आदिशक्ती पुरस्कार’ यांना मंत्रिमंडळाची मंजुरी

उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन-स्वयंसहाय्यता बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्धतेसाठी

vishwatmaklokswamivarta