vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी ट्रॅक्टरसाठी 31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावा

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी ट्रॅक्टरसाठी 31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावा

 सांगली, प्रतिनिधी: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना आहे. या योजनेकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी विहीत निकषानुसार व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 31 जुलै 2025 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सांगलीचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.   योजनेचे निकष – अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. स्वयंसहायता बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती घटकातील असावेत. स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचत गट नोंदणीकृत असावा.   आवश्यक कागदपत्रे – स्वयंसहायता बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र (तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती इ. ). स्वयंसहायता बचत गटाच्या नांवे असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स व या खातेशी अध्यक्ष व सचिव यांचे आधारलिंक असल्याचा पुरावा. स्वयंसहायता बचत गटाचा ठराव व सभासद यादी. स्वयंसहायता बचत गटातील सर्व सदस्यांचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे दाखले. स्वयंसहायता बचत गटातील सर्व सभासदांचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले रहिवाशी पुरावे (डोमेसाईल). स्वयंसहायता बचत गटातील सर्व सभासदांचे आधारकार्ड झेरॉक्स. 100 रू. स्टँम्पवर ट्रॅक्टर खरेदीबाबतचे हमीपत्र. सर्व कागदपत्रे ही साक्षांकीत केलेली असावीत.   अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक 

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !**महिलांच्या सक्षमीकरणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे राज्यभरात ‘शस्त्रपूजन’ आणि ‘शौर्यजागृती’ उपक्रम**लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची युवतींची लोकप्रतिनिधींकडे मागणी !*

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७-नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल-त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी…

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

vishwatmaklokswamivarta

पाईपलाईन दुरुस्तीमुळे 5 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद*

vishwatmaklokswamivarta

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta