vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पर्यावरणपूरक गणेशमुर्तीचा जागतिक विक्रम; 5,348जणांनी साकारल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती.

पर्यावरणपूरक गणेशमुर्तीचा जागतिक विक्रम; 5,348जणांनी साकारल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती

जालना, प्रतिनिधी) : एकाच वेळी सर्वाधिक व्यक्तींनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचा नवा विक्रम जालना जिल्ह्याने प्रस्थापित केला. 5 हजार 348 जणांनी एकाच ठिकाणी, एकाच वेळी शाडूमातीच्या गणेशमूर्ती साकारत यापूर्वीचा विक्रम मोडीत काढला. या ऐतिहासिक कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद व मान्यता मिळाल्याने जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यापूर्वी 28 ऑगस्ट 2022 रोजी बंगळुरू येथे 3 हजार 308 सहभागींच्या उपस्थितीत एकाच वेळी गणेशमूर्ती साकारण्याचा विक्रम नोंदविण्यात आला होता. आज येथील जेईएस महाविद्यालयात आयोजित उपक्रमात 5 हजार 348 जणांनी सहभाग घेत हा विक्रम तब्बल 2 हजार 040 सहभागींच्या फरकाने मोडला

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग, अद्विक क्लब तसेच दिव्य मराठी यांच्या समन्वयातून पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला. हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी आज एकाच ठिकाणी एकत्र येऊन शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारल्या. या उपक्रमामागील उद्देश केवळ विश्वविक्रम प्रस्थापित करणे हा नव्हता, तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणसंरक्षणाचा संदेश घराघरांत पोहोचविणे हा होता. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या साहित्याऐवजी नैसर्गिक व पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशमूर्तींचा स्वीकार करण्याचे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले

या प्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपस्थितांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, जलसंवर्धन आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश दिला. हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा केवळ विश्वविक्रमाचा आकडा नसून, पर्यावरणपूरक भविष्य घडविण्यासाठी नव्या पिढीने घेतलेला सामूहिक संकल्प असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, अद्विक क्लब, दिव्य मराठीची टीम, स्वयंसेवक, समन्वयक तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले. पूरस्थितीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी.राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन : 1070 (टोल-फ्री क्रमांक) नियंत्रण कक्ष : +91-9321587143अधिकृत ई-मेल : controlroom@maharashtra.gov.in

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड  

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनात दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावे-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…

श्रीक्षेत्र पुष्कराणी परिसरात बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क सुरक्षा उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश

अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा यांनी गढवाल रायफल्स रेजिमेंटचे कर्नल म्हणून पदभार स्वीकारला