vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाण्यात रंगणार ‘गोकुळ दहीहंडी २०२६’गोविंदा पथकांसाठी ५५ लाखांची बक्षिसेउत्सवात `नशामुक्त महाराष्ट्र’ ची होणार जनजागृती…

ठाण्यात रंगणार ‘गोकुळ दहीहंडी २०२६’गोविंदा पथकांसाठी ५५ लाखांची बक्षिसेउत्सवात `नशामुक्त महाराष्ट्र’ ची होणार जनजागृती…

ठाणे – प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) व शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने ‘गोकुळ दहीहंडी २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हा दहीहंडी उत्सव पार पडणार असून, स्व. मीनाताई ठाकरे चौक, कॅसल मिल नाका, ठाणे (प.) येथे गोविंदा पथकांच्या थराराचा अनुभव ठाणेकरांना घेता येणार आहे, अशी माहिती आयोजक ठाण्याचे उपमहपौर कृष्णा पाटील यांनी दिली आहे

यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे गोविंदा पथकांसाठी तब्बल ५५ लाख रुपयांची बक्षिसे व आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत. पुरुष गोविंदा पथकांसाठी १० थर रचणाऱ्या पथकास ११ लाख ११ हजार १११ रुपये, तर त्यानंतर प्रत्येक १० थर रचणाऱ्या पथकास ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच ९ थरांसाठी ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये, त्यानंतर प्रत्येक ९ थरांसाठी २ लाख २२ हजार २२२ रुपये, तर ८ थरांसाठी ५१ हजार रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

याशिवाय ७ थरांसाठी १५ हजार, ६ थरांसाठी ९ हजार, ५ थरांसाठी ५ हजार आणि ४ थरांसाठी ४ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.महिला गोविंदा पथकांसाठीही विशेष बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम ७ थर रचणाऱ्या पथकास १ लाख ११ हजार रुपये, त्यानंतर प्रत्येक ७ थरांसाठी ५१ हजार रुपये, ६ थरांसाठी २५ हजार रुपये, ५ थरांसाठी १० हजार रुपये आणि ४ थरांसाठी ५ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच पारंपरिक दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि सामाजिक संदेश जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. उत्सवस्थळी `नशा मुक्त युवा, नशामुक्त भारत’ हा संदेश देण्यासाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदा पाटील, आणि सचिन पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘गोकुळ दहीहंडी २०२६’चा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

सत्ता आमची लालसा नसून समाज संघटन आमचे उद्दिष्ट आहे – आ.संजय केनेकर

मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती येथून थेट गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या आपल्या वेबसाईट पोर्टलला आपल्या सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी इच्छुक प्रशिक्षकांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू   – उपमुख्यमंत्री अजित पवार- विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश- प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे- डीपीसीचा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन..

रंगनाथ महाराजांची ११० वी पुण्यतिथी सोहळा संपन्न,महाराजांच्या नामस्मरणाने सोहळ्याला दिव्य पावित्र्य लाभले – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta