vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सत्ता आमची लालसा नसून समाज संघटन आमचे उद्दिष्ट आहे – आ.संजय केनेकर

सत्ता आमची लालसा नसून समाज संघटन आमचे उद्दिष्ट आहे – आ.संजय केनेकर

जालना (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी कार्यालय, जालना येथे  भाजपा जालना महानगर व जालना ग्रामीण जिल्हा या दोन्ही जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी नवनियुक्त लोकप्रतिनिधी, सर्व आघाड्यांचे संयोजक यांची महत्वपूर्ण बैठक आ.नारायण कुचे व भास्कर आबा दानवे या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी बोलताना आ.संजय केनेकर म्हणाले की, सत्ता आमची लालसा नसून सर्व समाज संघटन करून अखंड भारतभर सर्व समाज एका ठिकाणी आणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्वप्नातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचा जिवनस्तर उंचावून त्यांचे स्वप्न साकार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पदवीधर मराठवाडा नोंदणी प्रमुख मधुकरराव देशमुख, भाजपा जेष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर पाटील भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, विश्वजित खरात, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्षा संध्याताई देठे, जिल्हा सरचिटणीस अनिलराव कोलते, सुनील पवार, गोविंद ढेंबरे, वसंत शिंदे, शिवप्रकाश चितळकर, अरुणा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष आनंद झा, सिद्धिविनायक मुळे, माजी जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, महेश निकम, संजय डोंगरे, भगवान मात्रे, नाना भागिले, राजू साळवे, नगरसेवक अर्जुन गेही यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ.केनेकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ने मंडळ स्तरापर्यंत कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग घेऊन वैचारिक अधिष्ठान, पक्षाचा इतिहास व विस्तार, संघटना विस्ताराची दृष्टी, आपली कार्यपद्धती, आपल्या सरकारची कामगिरी, बूथ व्यवस्थापन इत्यादी विषयांची मांडणी विषय अभ्यास्काद्वारे प्रशिक्षण वर्गात पदाधिकाऱ्यासमोर मांडून सर्व विषय पदाधिकाऱ्याना सविस्तर समजून सांगण्यात आले. तसेच सोशल मिडिया AI, नमो अॅप, सरल अॅप या वरती मंडळ प्रशिक्षणास उपस्थिती असलेल्या उपस्थितांची नोंदणी प्रदेश स्तरापर्यंत करण्यात आलेली आहे.

यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे व महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी जिल्ह्यात झालेले प्रशिक्षण वर्ग व आगामी होत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्व तयारी तसेच नारी वंदन अभियान पूर्व तयारी याची सविस्तर माहिती प्रदेश सरचिटणीस व जालना जिल्हा प्रभारी आ.संजयजी केनेकर यांच्यासमोर सांगितली.

यावेळी दुर्गेश कुरील, सोमेश काबलिये, सतीश केळकर, रोहित भुरेवाल, वीरेंद्रकुमार धोका, शिवराज नारियलवाले, आनंद झारकंडे, विकास कदम, गजानन खरात, संतोष खंडेलवाल, नागेश अंभोरे, संदीप चव्हाण, मुकेश चव्हाण, बद्रीनाथ वाघ, विष्णू डोंगरे, अकबर परसूवाले, जिवन खुरमुटे आदींची उपस्थिती होती.

00000

संबंधित पोस्ट

साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा,चित्रलेखाचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार तरुणांना नवीन संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही

नवीन आधार केंदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत सुरक्षित तटम् समृद्ध भारत ; सीआयएसएफ वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन

vishwatmaklokswamivarta

सायकलिंग स्पर्धेमुळे वाहतुक मार्गात बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी नियोजनभवनात संवादसातत्यपूर्ण संवादासाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम,प्रत्येक अडचण सोडवून योजनांचा लाभ मिळवून देणारजिल्हाधिकारी वर्षा मीना

vishwatmaklokswamivarta