vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जेष्ठ नागरिक चर्मकार बांधवांचा स्टॉल मूळ जागेपासून हलवल्यामुळे समाजात तीव्र नाराजी संताप..

जेष्ठ नागरिक चर्मकार बांधवांचा स्टॉल मूळ जागेपासून हलवल्यामुळे समाजात तीव्र नाराजी संताप..

मुंबई प्रतिनिधी माहीम-शितळा देवी मंदिराच्या समोर, बांबुळी निवास, लेडी जमशेदजी रोड, माहीम पश्चिम, येथील फूटपाथ वरील माने फुट वेअर स्टॉल हे जेष्ठ नागरिक तानाजी मारुती माने यांचं दुकान आजूबाजूच्या दुकानदारांनी आणि काही समाजकंटकांनी त्यांच्या परवानगी व्यतिरिक्त हलवून त्यांच्या जागेपासून जवळजवळ 200 फूट लांब दुसऱ्या इमारतीच्या फुटपाथ वर नेऊन ठेवला आणि खोडसाळपने

सदर स्टॉल हा आमच्या दुकानाच्या पुढ्यात अनधिकृत पणे ठेवला असल्याबाबतची तक्रार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केली सदर स्टॉल चे लायसन्स चाळीस वर्षे जुनं असून त्याच्याही पूर्वीपासून सदर स्टॉल मालक तानाजी मारुती माने हे आपला गटई काम व छत्री रिपेरिंग बेगा रिपेरिंग या पद्धतीचे कामकाज करत सेवा व्यवसाय बजावत आहे

 सदर बांबुळी निवास या इमारतीचे दुरुस्ती काम निमित्त सदर स्टॉल हा थोडासा बाजू ला सरकवून ठेवण्याबाबत सदर इमारतीचे मालक यांचे कडून स्टॉल मालक यांना कळवले असता राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आमदार बाबुरावजी माने साहेबांनी याबाबत सर्व गोष्टींमध्ये स्वतः जातीने लक्ष घालून सदर स्टॉल इमारतीच्या दुरुस्ती होईपर्यंत एक महिनाभरासाठी थोडा सरकवून ठेवूया इमारत दुरुस्तीचे कामकाज पूर्ण होताच परत मूळ ठिकाणी सदर स्टॉल लावला जाईल याबाबतीत सदर इमारतीचे मालक यांच्याशी चर्चा केली होती

 वास्तविक पाहता या स्टॉलच्या कुणालाही त्रास नव्हता आणि तो स्टॉल जिथे सरकवून ठेवला होता त्याच्या पाठीमागचं टेलरचे दुकान हे गेले अनेक वर्ष बंद असून दुकानाचा मालक परदेशात आहे असे असताना कोणी तथाकथित स्थानिक इस्टेट एजंट दलाल यांनी आमच्या दुकानाच्या समोर स्टॉल ठेवल्यामुळे आमचे दुकान दिसत नाही यांचे बंद असलेले दुकान दिसत नव्हते असे म्हणून बळजोरीने तो स्टॉल रोडच्या दुसऱ्या कोपऱ्यावर ठेवला होता तर तिथे दुसरे दुकानदार म्हणायला लागले माझे दुकान दिसत नाही इथूनही हा स्टॉल हलवला पाहिजे असे म्हणत स्टॉल मालक यांच्या परवानगी व माहिती व्यतिरिक्त तो स्टॉल त्या जागेवरून जवळजवळ 200 फुट लांब ठेवला होता दुसऱ्या इमारतीच्या पुढ्यात त्यामुळे तेथील दुकानदारांनी वाद घालत तक्रार केली सदर घटनेबाबत माहिती मिळताच माननीय आमदार बाबुरावजी माने यांच्या आदेशाने राष्ट्रीय चर्मकार संघ यांच्या पदाधिकारी धारावी तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली वार्ड अध्यक्ष विजय खरात कार्याध्यक्ष शंकर बळी आणि हेमंत बामणे या सर्वांनी त्या जागेवर जाऊन समस्या समजून घेतली व परत मूळ जागी दुकान मांडण्यास मदत केली भर दुपारी उन्हातल्या वेळेपासून रात्री उशिरापर्यंत सदर कामकाज सुरू होते यादरम्यान महानगरपालिका कार्यालय दादर, जी नार्थ वार्डाचे लायसन्स इन्स्पेक्टर हे सुद्धा जागेवर हजर राहिले असता संघ पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रकार त्यांना समजावून सांगितला व मदतीसाठी विनंती केली.

 चर्मकार समाजच नव्हे तर इतरही सर्व समाजातील विविध समस्यांच्या बाबतीत राष्ट्रीय चर्मकार संघाचे सन्माननीय अध्यक्ष मा आमदार बाबुरावजी माने आणि सर्व पदाधिकारी खंबीरपणे सर्व समाज बांधवांच्या पाठीशी उभे असतात तमाम समाज बांधवांना याद्वारे हे आवाहन आहे की त्या सर्वांनी माननीय बाबुराव माने साहेबांच्या राष्ट्रीय चर्मकार संघाच्या माध्यमातून समाजाची एक भक्कम अशी एकजूट समर्थपणे उभी करावी

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता दि. 15 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजता या वेळेत मतदान सुरू होणार

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’चे पुणे येथे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान लोक चळवळ व्हावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

इंदिरानगर मध्ये पीआर कार्ड सर्वेक्षणाचा जालना मनपाकडून शुभारंभ–निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता – स्थायी सभापती अशोक पांगारकर

ठाणे जिल्ह्यात समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यरत १०० कंत्राटी विषय शिक्षकांना कायम नेमणुकीचे आदेश,मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते आदेश वितरित…

vishwatmaklokswamivarta

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी