vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपा क्षेत्रातील कोचिंग क्लासेस व शिकवणी वर्गांना ‘स्ट्रक्चरल स्टेबिलिटी’ आणि ‘अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र’ जमा करण्याचे आवाहन

नमुंमपा क्षेत्रातील कोचिंग क्लासेस व शिकवणी वर्गांना ‘स्ट्रक्चरल स्टेबिलिटी’ आणि ‘अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र’ जमा करण्याचे आवाहन

 

      नवी मुंबई प्रतिनिधी    नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, नवी मुंबई महानगरपालिका परवाना विभागामार्फत सर्व खाजगी कोचिंग क्लासेस, शिकवणी वर्ग, अभ्यासिका आणि तत्सम शैक्षणिक उपक्रम चालविणाऱ्या व्यक्ती व संस्थांना एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.

          त्यानुसार नमुंमपा क्षेत्रातील सर्व शैक्षणिक उपक्रम चालविणा-या व्यक्ती / संस्था यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता तसेच संबंधित आस्थापनेची इमारत/जागा सुरक्षित व वापरास योग्य असल्याची खात्री करण्याच्या दृष्टीने आपल्या इमारतीचे स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट (Structural Stability Certificate) तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (Fire NOC) नवी मुंबई महानगरपालिकेच्या परवाना विभागामध्ये (License Department) जमा करणे आवश्यक आहे.

 

यामध्ये – (1) संबंधित इमारत / जागेचे अद्ययावत Structural Stability Certificate (संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र) सक्षम प्राधिकृत Structural Engineer यांचेकडून प्राप्त करून सादर करावे. तसेच, (2) संबंधित आस्थापनेसाठी प्राप्त नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (Fire NOC) सादर करावे.

      सदर प्रमाणपत्रे अद्ययावत असणे आवश्यक असून, आवश्यकता असल्यास त्यांचे नूतनीकरण करून परवाना विभागाकडे सादर करावे असे सूचित करण्यात येत आहे.

      विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्या अथवा संबंधित नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध लागू असलेल्या कायदे, नियम व महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक ती प्रशासकीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असेही सूचित करण्यात आले आहे.

          संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तसेच, विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य यंत्रणा उपलब्ध असल्याची खात्री करण्यासाठी ही प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. तरी विद्यार्थ्यांची व नागरिकांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य असल्याने सर्व कोचिंग क्लासेस, शिकवणी वर्ग व तत्सम शैक्षणिक उपक्रम चालविणाऱ्या व्यक्ती / संस्थांनी आपले स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) नवी मुंबई महापालिकेच्या परवाना विभागामध्ये जमा करावे असे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.

I

संबंधित पोस्ट

सावकारी जाचाने पीडित कर्जदारानी योग्य त्या पूराव्यानिशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

vishwatmaklokswamivarta

काशिमिरा पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई: २२.३३ कोटींचे कोकेन जप्त, दोन परदेशी नागरिकांसह एका भारतीय महिलेला अटक. पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश..

राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा सर्जनशील जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन याबरोबरच टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

गुणवान आणि चारित्र्यवान चिकित्सकांचे निर्माण हा धन्वंतरी जयंतीचामुख्य उद्देश : डॉ. अरुण खैरे 

vishwatmaklokswamivarta