vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा..

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा..

 लातूर, द प्रतिनिधी : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्‍या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे व मुलांचे १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य याची निःशुल्क व्यवस्था करण्‍यात येते. सन २०२५-२६ साठी रिक्त असलेल्‍या जागेवर वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १० मार्च, २०२६ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्‍पन्‍न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्‍त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहराच्या तथा तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नसावा. विद्यार्थी बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. तसेच विद्यार्थ्यांने इयत्ता बारावीमध्ये ६० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असावेत.

वरील अटींची पूर्तता करत असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्‍च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती वृषाली बडे (भ्रमणध्वनी क्र. ९०२८२६११८३) यांचेशी संपर्क करावा किंवा लातूर येथील मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल तिरुके सुरज (भ्रमणध्वनी क्र. ८३२९४४७४१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक अभय अटकळ यांनी केलेले आहे.

****

संबंधित पोस्ट

विधानपरिषद लक्षवेधी :नाशिक जिल्हा परिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक व मानसिक छळ प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई-ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवून रणरागिणी बनण्यास तयार व्हा _१ हजारपेक्षा अधिक युवतींना विनामूल्य प्रशिक्षण !_*युवतींना सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ७ डिसेंबरला कोल्हापूर येथे ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ !*

vishwatmaklokswamivarta

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत महत्वाचे विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

vishwatmaklokswamivarta

समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याणकरण्याची राज्य शासनाची भूमिका- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे- मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात – 21 स्टॉलमधून शासनाच्या योजनांची माहिती प्रदर्शित विविध शासकीय योजनांचा 3 हजार 800 हून अधिक लाभार्थींना लाभ वाटप

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

आजपासून (दि.९) तीन दिवस दुर्मिळ वाद्यमहोत्सव

vishwatmaklokswamivarta